शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पतसंस्थांचे ३२ हजार कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 19:18 IST

केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या प्रचलित नोटा बाद ठरविल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या सहकारी

ऑनलाइन लोकमत/मिलिंदकुमार साळवेअहमदनगर, दि. ११ -  केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या प्रचलित नोटा बाद ठरविल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या सहकारी पतसंस्थांचे सुमारे ३२ हजार कोटी रुपये विविध बँकांमध्ये अडकून पडले आहेत. या पतसंस्थांना हजार व पाचशे रुपयांच्या प्रचलित नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना याबाबत विचारले असता त्यांनी महाराष्ट्रात १५ हजार ६७० सहकारी पतसंस्था असून त्याद्वारे २२ हजार कोटी रुपयांचे आपल्या ग्राहकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ कोटी २२ लाख सभासद आहेत. त्यांचे राज्यभरातील १५ हजार ६७० विविध प्रकारच्या सहकारी पतसंस्थांमध्ये ३२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. हा सर्व पैसा या पतसंस्थांनी जिल्हा सहकारी बँकांसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवला आहे. हजार व पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद ठरविण्याच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांना बाद केलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार डिसेंबरअखेर स्वीकारता येणार आहेत. पण पतसंस्थांना मात्र या बाद केलेल्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे पतसंस्थांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवलेले त्यांचेच पैसे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेमुळे काढता येत नाहीत. पतसंस्थांनाही वैयक्तिक खातेदार मानून एका दिवसाला १० हजार रुपये व आठवड्यात २० हजार रुपयेच बँकांमधून काढण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पतसंस्थांच्या ग्राहकांना व कर्जदारांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचे कसे? असा प्रश्न पतसंस्था चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पतसंस्थांचे तब्बल ३२ हजार कोटी रुपये बँकांमध्ये अडकून पडले आहेत, असे त्यांनी सांगितले. बँकांमध्ये हजार व पाचशेच्या नोटा बँकांमध्ये स्वीकारल्या जात असताना पतसंस्थांमध्ये स्वीकारल्या जात असल्याने पतसंस्थांच्या ग्राहकांना या नोटा घेऊन माघारी फिरावे लागत आहे. दुसरीकडे पतसंस्थांना बँकांमधून मिळणाऱ्या रकमेलाही मर्यादेचा फटका बसत असल्याने राज्यभरातील पतसंस्थांचे कामकाज ठप्प झाले आहे.शनिवारी पुण्यात बैठक...पतसंस्थांसमोर निर्माण झालेल्या अडचणींबाबत राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना पतसंस्था फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेसह पतंप्रधानांचेही आमच्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शनिवारी पुण्यात सहकार आयुक्त व आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पतसंस्था चालकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.- काका कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन.