शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना ३२ कोटींची लक्ष्मी पावणार

By admin | Updated: November 2, 2016 20:20 IST

दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे.

ऑनलाइन लोकमत/मिलिंदकुमार साळवे अहमदनगर, दि. 02 - दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तब्बल ३२ कोटी रुपयांची लक्ष्मी जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना पावणार आहे.यावर्षी (२०१६) जुलै व आॅगस्टमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे. या कालावधीत राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अधिक उत्पादनामुळे कांद्याचे भाव राज्यभरातच गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. त्यानंतर राज्यभरातूनच कांदाउत्पादकांना सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी झाली. या मागणीची व शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेत राज्य सरकारने जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात बाजार समितीच्या आवारात अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फत कांदाविक्री करणाऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याची मर्यादा घालण्यात आली.त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारात विक्री केलेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांना स्वत:च्या नावे असलेला सातबारा उतारा, कांदा विक्रीच्या हिशेब पावतीच्या छायांकित प्रती, बँक बचत खाते क्रमांक, संपूर्ण नाव व पत्त्यासह कांदा अनुदान मागणी अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी सुरुवातीस २२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदान मागणी अर्ज सादर करण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती.नगर जिल्ह्यात ३२ लाख शेतकऱ्यांना लाभया मुदतीत अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडे २ लाख १७ हजार ४०७ लाभार्र्थींकडून प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यांनी बाजार समित्यांमध्ये ३२ लाख ३३ हजार ७२७ क्विंटल ४३ किलो कांदाविक्री केला होता. प्रतिक्विंटल १०० रुपये व कमाल २०० क्विंटल प्रतिलाभार्थी प्रमाणे या कांदाउत्पादकांना ३२ कोटी ३३ लाख ७२ हजार ७४३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारने प्राप्त प्रस्तावांची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांमार्फत छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रस्तावांची छाननी सुरू केली आहे. सर्वाधिक लाभार्थी राहुरी बाजार समितीमध्ये नोंदविले गेले आहेत.