शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३२ कोटींचा नालेकंत्राट घोटाळा?

By admin | Updated: July 1, 2016 03:10 IST

उल्हास नदी प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याच्या कामाचे ३२ कोटींचे कंत्राट देताना त्यात कंत्राटदारांना कोणत्याही अर्टी व शर्ती न घातल्याने

सदानंद नाईक,

उल्हासनगर- उल्हास नदी प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याच्या कामाचे ३२ कोटींचे कंत्राट देताना त्यात कंत्राटदारांना कोणत्याही अर्टी व शर्ती न घातल्याने, त्यावर सचिवांची मोहोर नसल्याने आणि या कंत्राटाच्या कराराचे मुद्रांक शुल्क भरलेले नसल्याने सर्व प्रक्रियाच वादग्रस्त ठरली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रकाश कुकरेजा यांनी केली आहे.उल्हासनगरातील सांडपाणीयुक्त खेमाणी नाला सेन्च्युरी कंपनीजवळ उल्हास नदीला मिळतो. नाल्यातील प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा २१ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना होतो. त्यामुळे नाल्याचा प्रवाह वळविण्याचे निर्देश शासनासह न्यायालयाने पालिकेला वारंवार दिले होते. शासनाच्या मदतीने नाल्यातील सांडपाणी भुयारी गटाराद्बारे पंपिग मशिनने उल्हास खाडीत सोडण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. खेमाणी नाल्याचा प्रवाह वळवून त्यातील सांडपाणी उल्हास खाडीत सोडण्याच्या कामाचा ठेका खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि. आणि जयभारत कन्स्ट्रक्शन प्रा लि. कंपनीला ३२ कोटींना देण्याचा करारनामा ३ फेब्रुवारीला झाला आणि ८ फेब्रुवारीला तो देण्यात आला. मात्र या करारावर पालिका सचिवांची मोहोर नाही. नियमानुसार त्या कारारातील रकमेचे मुद्रांक शुल्क भरलेले नाही, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले. हा नाला वळवण्याचे काम कसे झाले पाहिजे, त्याच्या अटी आणि शर्तींचा करारनाम्यात उल्लेखच नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन आणि करारनाम्यावर सह्या करणारे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ठेकेदाराने काम ठरलेल्या निकषांनुसार केले आहे की नाही हे तपासून पाहायचे असेल तर त्यासाठी अटी आणि शर्ती असाव्या लागतात. मात्र त्याच घातलेल्या नसल्याने या कामाचा दर्जा तपासणार कसा असा प्रश्न कुकरेजा यांनी उपस्थित केला .महापालिकेच्या विविध कामाचा ठेका खाजगी कंपन्यांना दिल्यावर त्यावर पालिका सचिवांची मोहोर उमटवावी लागते. त्यानंतर ठेक्याचा करारनामा होतो. त्यावेळी कंपनीला ठेक्यातील एकूण किंमतीवर एक टक्का मुद्रांक शुल्क भरावे लागते, असा नियम असतानाही खेमाणी नाल्याचा ३२ कोटींचा करारनामा पालिका सचिवांची मोहोर आणि मुद्रांक शुल्काविना झाला आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार नगरविकास सचिव, पालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. >नियमबाह्य असल्यास कारवाई करणारखेमानी नाल्याच्या करारनाम्याबाबत तक्कार आल्याने त्याची माहिती घेणार आहे. करारनामा नियमबाह्य असेल किंवा कायदाबाह्य करण्यात आला असेल तर ठेकेदारासह संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- मनोहर हिरे, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका‘नियमानुसारच करारनामा’खेमानी नाल्याचा प्रवाह आणि सांडपाणी उल्हास खाडीत टाकण्याच्या कामाचा ३२ कोटीचा ठेका आम्ही खिलारी कंपनीसोबत घेतला आहे. त्यातील ३२ लाखावरील मुद्रांक शुल्क भरले आहे. निविदेतच अटी-शर्ती नमूद केलेल्या हेत्या. तसेच सचिवांची मोहोरही करारनाम्यावर आहे.- केशव चंदनानी, ठेकेदार, जयभारत कन्स्ट्रशन प्रा लि.