शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

केईएममध्ये बसविणार ३२ सीसीटीव्ही

By admin | Updated: September 27, 2015 05:39 IST

केईएम रु ग्णालयात येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीससीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सध्या नादुरु स्त असलेले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित केले जातील

मुंबई : केईएम रु ग्णालयात येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीससीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सध्या नादुरु स्त असलेले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित केले जातील. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष सुरक्षारक्षक नेमले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.केईएममधील बालरुग्ण विभागातील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या मारहाणीत चार डॉक्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर निवासी डॉक्टर अचानक संपावर गेल्यामुळे रु ग्णसेवेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. जखमी डॉक्टरांची विचारपूस केली. त्यानंतर विनोद तावडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्य:स्थितीचा विचार करण्यात आला. या बैठकीला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार अजय चौधरी, नगरेसवक, रुग्णालयाचे डीन, पोलीस अधिकारी, तसेच मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णालयात रुग्णसेवेवर कोणताही ताण न पडता रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रु ग्णालय प्रशासन दक्षता घेईल, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. मार्डच्या निवासी डॉक्टरांनी केईएममध्ये सुरू केलेला संप आता मागे घ्यावा, असे आवाहनही महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी केले. (विशेष प्रतिनिधी)