शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यूचा दर नोंदविण्यासाठी राज्यात ३0६ केंद्र

By admin | Updated: September 1, 2014 01:35 IST

राज्यात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र; लवकरच सुरु होणार काम

संतोष येलकर/अकोलाजन्म-मृत्यूचा दर ठरविण्यासाठी राज्यात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. या जिल्हानिहाय केंद्रांवर जन्म-मृत्यूच्या दराबाबतची माहिती नोंदविण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.दर दहा वर्षांनी होणार्‍या जनगणनेची आकडेवारी प्रसिध्द झाल्यानंतर, जन्म व मृत्यूचा दर ठरविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनगणना विभागामार्फत नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्‍चित केली जातात. त्यानुसार सन २0११ च्या जनगणनेवर आधारित जनगणना विभागाच्या राज्य कार्यालयामार्फत राज्यभरात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र गत जानेवारीमध्ये निश्‍चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर जन्म व मृत्यू बाबतची माहिती नोंदविण्याचे काम सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. केंद्र परिसरातील गावांमधील जन्म-मृत्यूची नोंदीची माहिती आशा, अंगणवाडी सेविकांकडून दरमहा संबंधित केंद्रांकडे सादर करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत सादर केली जाते, जिल्हानिहाय संकलित करण्यात आलेली ही माहिती जनगणना विभागाकडे पाठविली जाते. या माहितीच्या आधारे दर तीन, सहा, नऊ आणि बारा महिन्यातील जिल्हानिहाय जन्म-मृत्यू दराचे अंदाज निश्‍चित केले जातात. *नमूना नोंदणी केंद्रांची लवकरच पाहणी!जन्म-मृत्यूचे दर ठरविण्यासाठी माहिती संकलित करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी राज्यात निश्‍चित करण्यात आलेल्या नमूना नोंदणी केंद्रांना जनगणना विभागाचे क्षेत्रिय अधिकारी भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या केंद्रांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु होणार आहे.