शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

३०५ सी.सी.इंजिन अन १० अश्वशक्तीची मॉडेल कार

By admin | Updated: September 16, 2016 02:01 IST

नाशिक येथील गोदावरी नदीकाठी सन २०१७ मध्ये होऊ घातलेल्या ‘आॅल टर्म व्हेकल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता स्थानिक पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या

अमरावती : नाशिक येथील गोदावरी नदीकाठी सन २०१७ मध्ये होऊ घातलेल्या ‘आॅल टर्म व्हेकल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता स्थानिक पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ३०५ सीसीचे इंजिन आणि १० अश्वशक्तीच्या मॉडेल कारच्या आभासित ढाच्याचे यशस्वी सादरीकरण करून एक मोठा टप्पा गाठला आहे. अभियंतादिनी या महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. मागील वर्षी चंदीगढ येथे झालेल्या आभासी ढाच्याच्या सादरीकरण फेरीत या चमुने त्यांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. या मॉडेल कारवर मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थी व प्राध्यापकांची चमू कठोर परिश्रम घेत होती. ७ फूट ३ इंच लांब व ५ फूट २ इंच इतकी उंच अशी ही कार तयार करण्यात आली आहे. ही कार कोणत्याही रस्त्यावर वा पृष्ठभागावर सहजरीत्या धावू शकते. विशेष म्हणजे या कारचे वजन २९० किलोमीटर इतके असून त्याचे इंजिन मागील बाजूस बसविण्यात आले आहे. या कारचा ढाचा तयार करण्याकरिता मेटॅलिक पाईपचा वापर करण्यात आला आहे. एक रिव्हर्ससह पाच गिअर या कारला बसविण्यात आले आहेत. या मॉडेल कारच्या यशस्वी निर्मितीकरिता विभागप्रमुख एस.जी.फाले यांचे मार्गदर्शन लाभले. एस.जे.देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेत सहभागी एकूण १२ विद्यार्थ्यांनी ही कार तयार करण्याकरिता प्रयत्न केलेत्. (प्रतिनिधी)