शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

नव्या जिल्ह्यासाठी ३०२० पोलीस

By admin | Updated: August 2, 2014 02:58 IST

क्रवारपासून अस्तित्वात आलेल्या सागरी अन् डोंगरी सौंदर्याने नटलेल्या नव्या पालघर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अपर पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक,

नारायण जाधव, ठाणेशुक्रवारपासून अस्तित्वात आलेल्या सागरी अन् डोंगरी सौंदर्याने नटलेल्या नव्या पालघर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अपर पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक, २२ निरीक्षक, ४८ सहायक निरीक्षक, १२१ उपनिरीक्षक, २२६ उपनिरीक्षक, ४२७ हेड कॉन्स्टेबल, ६१५ पोलीस नाईक, १३८४ शिपायांसह सुमारे ३०२० कर्मचाऱ्यांचा स्टाफ दिमतीला देण्यात आला आहे़ जिल्ह्याच्या सुमारे ५७६६ चौ. किमी क्षेत्रातील तीन नगरपालिका अन् एका महापालिकेसह ९५६ गावांत राहणाऱ्या १४ लाख ३५ हजार १७८ इतक्या लोकसंख्येच्या संरक्षणाची जबाबदारी हे ३०२० कर्मचारी २२ पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सांभाळणार आहेत़ मुंबईवरील २६/११च्या अतिरेकी हल्ला करणारे अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गेच आल्याने पालघर जिल्ह्याचा समुद्रकिनारा अतिसंवेदनशील मानला जातो़नव्या जिल्ह्याचा बहुतांश भाग सागरी असल्याने समुद्रकिनारी गस्तीसाठी ७ बोटींसह विविध १७५ वाहने, ३०४ बिनतारी संदेश यंत्रणा, ५९२ एसएलआर रायफल, ९ एके ४७ मशिनगन, ९३ कार्बाइन, १९७ पिस्तूल (९ एमएम), ५ गॅस गनसह १०८४ हत्यारे आणि या हत्यारांसाठी लागणारी सुमारे १,२६,६६१ इतकी काडतुसे व तत्सम दारूगोळा या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे़राज्य मंत्रिमंडळाने आपल्या १३ जून २०१४ रोजी झालेल्या बैठकीत नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर त्यातील पालघर, वसई, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि तलासरी या आठ तालुक्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पोलीस कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी ठाणे पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त कर्मचारी/अधिकारी, वाहने, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वर्ग करण्यास राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ९ जुलै २०१४ रोजी मान्यता दिली होती़ त्यानुसार गृह विभागाने यासंदर्भात ३० जुलै २०१४ रोजी तातडीचा आदेश काढून आज १ आॅगस्टपासून अस्तित्वात येणाऱ्या पालघर जिल्ह्यासाठी हा कर्मचारीवर्ग करण्याचे आदेश काढले़ जुन्या ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीतील ४७०० कर्मचारी/अधिकाऱ्यांमधूनच हा स्टाफ देण्यात आला आहे़ यामुळे आता त्यांच्याकडे १७८० इतक्या स्टाफसह १५ पोलीस ठाणीच राहणार आहेत़