शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात ३00 रेल्वे अपघात!

By admin | Updated: August 10, 2015 22:47 IST

भरपाईपोटी प्रशासनाला ९४५.५३ कोटींचा भुर्दंड.

अकोला : गत ४ वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी लागलेली नुकसानभरपाई, यामुळे भारतीय रेल्वेला या कालावधित ९४५.५३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.             सन २0११-१२ ते २0१४-१४ या चार वर्षांमध्ये देशभरात घडलेल्या रेल्वे अपघातांची माहिती रेल्वे प्रशासनाने संकलित केली आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेले अपघात, निकृष्ट स्लिपर्स आणि रुळांची निकृष्ट बांधणी (वेल्डिंग) या रेल्वे सुरक्षेला आव्हान देणार्‍या तीन प्रमुख कारणांमुळे घडलेल्या अपघातांची दखल या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक कारणे आणि मानवी त्रुटी तसेच निकृष्ट झालेले रेल्वे पूल व रेल्वे उड्डाणपुलांमुळे घडलेल्या अपघातांचा यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटकांवर आणि रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या गंभीर अपघातांची नोंदही या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.               सन २0११-१२ मध्ये ७७ गंभीर स्वरूपाचे रेल्वे अपघात घडले. त्यात ११५ जण मृत्युमुखी पडले, तर ५७४ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाला नुकसानभरपाईपोटी १४५.९४ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी १७४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.              सन २0१२-१३मध्ये ६९ गंभीर अपघात घडले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८१ जणांच्या कुटुंबियांना व ३00 जण गंभीर जखमींना रेल्वेला १७0.३५ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागली. मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वेला १२९.१७ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.              सन २0१३-१४मध्ये देशभरात ७१ रेल्वे अपघात घडले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या ५४ जणांच्या कुटुंबियांना व ११९ गंभीर जखमींना ११.९३ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली, तर ७४.४१ कोटींचा आर्थिक फटका मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागला.                सन २0१४-१५मध्ये देशात ८0 गंभीर रेल्वे अपघात घडले. त्यात १२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३३५ जण गंभीर जखमी झाले. या वर्षात रेल्वेला मृत आणि जखमींच्या नुकसानभरपाईपोटी १२३.११ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी रेल्वेला ८१.९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.