शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

थकविली ३०० कोटींची पाणीपट्टी

By admin | Updated: November 30, 2015 02:02 IST

शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल अशा नऊशे थकबाकीदारांनी ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी अनेक दिवसांपासून थकविली असल्याचे उजेडात आले आहे

पुणे : शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल अशा नऊशे थकबाकीदारांनी ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी अनेक दिवसांपासून थकविली असल्याचे उजेडात आले आहे. या थकबाकीच्या वसुलीकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने ती आणखीनच फुगत चालली आहे. यंदा महापालिकेचे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने थकबाकीच्या वसुलीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.राज्य शासनाने एलबीटी बंद केल्याने महापालिकेला मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने उत्पन्नाचे इतर मार्ग शोधण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या उत्पन्न खर्चाचा सहामाही आढावा घेतला असता त्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे अनावश्यक खर्चांना कात्री लावण्याच्या सूचना आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्या होत्या. मात्र त्याच वेळी उत्पन्न वाढीसाठी प्रशासन फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.पाणीपट्टी थकविणाऱ्या ९०० जणांमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलय, पोलीस आयुक्तालय, शहरा लगतच्या ग्रामपंचायती, नामांकित हॉस्पिटल, पुणे कॅन्टोमेंट बोर्डमधील कार्यालय, सेंट्रल रेल्वेचे कार्यालय, विविध महाविद्यालये, शासकीय कार्यालय, महावितरण कार्यालय, बांधकाम व हॉटेल व्यावसायिक यांचा समावेश आहे. पाणीपट्टी थकल्यानंतर लगेच नळ कनेक्शन तोडण्याची तरतूद महापालिका अधिनियमामध्ये आहे. मात्र ही थकीत पाणीपट्टीची वसुली करण्याऐवजी त्याच व्यक्तींना पुन्हा नळकनेक्शन देण्यात आल्याचे प्रकार उजेडात आले आहे. याबाबात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘महापालिकेकडून मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, त्या वेळी काही जणांची पाणीपट्टीची रक्कम थकली आहे. ही थकबाकीदारांची यादी मिळकत विभागाला देण्यात आली आहे, त्यांच्या मदतीने ती वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर ही थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा विचार केला जात आहे.’’