शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राणीच्या बागेत ३० वर्षांतील गर्दीचा उच्चांक

By admin | Updated: March 20, 2017 03:42 IST

पेंग्विन बघण्यासाठी रविवारी राणीच्या बागेत २० हजार मुंबईकरांची झुंबड उडाली़ गेल्या ३० वर्षांत राणीच्या बागेत प्राणी बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा हा उच्चांक

मुंबई : पेंग्विन बघण्यासाठी रविवारी राणीच्या बागेत २० हजार मुंबईकरांची झुंबड उडाली़ गेल्या ३० वर्षांत राणीच्या बागेत प्राणी बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा हा उच्चांक होता़ राणीच्या बागेचा आसपासचा परिसर मुस्लीम लोकवस्तीचा आहे़ त्यामुळे ईदच्या दिवशी येथे दहा ते बारा हजार पर्यटक येतात़ रविवारी येथे येणाऱ्यांची संख्याही दहा ते बारा हजारच असते़ इतर दिवशी येथे पाच ते सहा हजार पर्यटक येतात़ पेंग्विनमुळे गर्दीचा नवीन विक्रम झाला आहे़महापालिकेच्या निवडणुका, राजकीय आरोप आणि प्रत्यारोप अशा घडामोडींनंतर, तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना पेंग्विनला पाहण्याची संधी मिळाली. रविवारी सुट्टीच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भायखळा येथील राणीच्या बागेत गर्दी केल्यामुळे, राणीची बाग हाउस फुल्ल झाली होती. सध्या मोफत असलेला पेंग्विन दर्शनासाठी १ एप्रिलपासून शंभर रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये ही पेंग्विन कक्षाबाहेर रांगाच रांगा लागणार आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, राणीच्या बागेतील प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले. सुमारे २० हजार मुंबईकरांनी पेंग्विन कक्षाला भेट दिली. पेंग्विनला पाहण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. राजकारणातील मुद्दा झालेले पेंग्विन कक्षाचे शुक्रवारी लोकार्पण झाले. शनिवारी तब्बल १२ हजार मुंबईकरांनी पेंग्विनचे रूप डोळ््यात साठवले. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्यतो प्रयत्न केले. मुंबईकरांची लांबच लांब रांग लागल्यामुळे काही काळ पेंग्विन कक्ष बंद ठेवण्यात आले. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव कक्ष खुले करण्यात आले. रांग प्रवेशद्वाराबाहेर गेल्याने, काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला. (प्रतिनिधी)‘डोनाल्ड’ची मुंबईकरांना ही भुरळ-बागेतील पेंग्विन कक्षातील हेम्बोल्ट जातीच्या पेंग्विनची मोल्ट, डेझी, पोपॉय, फ्लिपर, बबल, आॅलिव्ह अशी नावे आहेत. या पेंग्विनमध्येदेखील डोनाल्ड नावाच्या पेंग्विनची के्रझ मुंबईकरांमध्ये दिसून आली. कक्षात जाणाऱ्या प्राणिप्रेमींनी कक्षात प्रवेश करताच पेंग्विनला नावाने हाक मारतात.