शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका आयुक्तांना ३० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 05:20 IST

सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग आतापर्यंत का लागू करण्यात आला नाही?

मुंबई : सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग आतापर्यंत का लागू करण्यात आला नाही? याबद्दल उच्च न्यायालयाने सोलापूर पालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. मात्र २०१५ पासून आतापर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आयुक्त टाळाटाळ करत असल्याने अखेरीस न्यायालयाने आयुक्तांना ३० हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला.सोलापूर पालिकेच्या अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१५ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. परंतु, परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग देण्यात आला नाही. त्यामुळे या विभगातील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे चौकशी केली. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करण्याबाबत शासनापुढे प्रस्ताव सादर केला असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे, अशी माहिती आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेच्या अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शासनाची परवानगी मागण्यात आली होती का? याबद्दल माहिती मागवली. त्यामध्ये अशी कोणतीच परवानगी शासनाकडून घेतली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कर्ण बाबरेंसह बारा जणांनी अ‍ॅड. विश्वास देवकर यांच्याद्वारे याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. कर्मचाऱ्यांवर महापालिका अन्याय करत आहे, असे म्हणत खंडपीठाने २०१५ मध्ये आयुक्तांना याबाबत जाब विचारला होता. तीन वेळा संधी देऊनही आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची तसदीही घेतली नाही. या वागण्यावर संताप व्यक्त करत उच्च न्यायालयाने दंड ठोठावला. (प्रतिनिधी)