शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बॅग नसल्याने सोडले ३० लाख

By admin | Updated: January 28, 2015 05:11 IST

खासगी कंपनीच्या व्हॅनमधून एटीएम मशिनमध्ये भरणा करण्यासाठी निघालेली एचडीएफसी बँकेची ३० लाखांची रोकड दरोडेखोरांनी मागे सोडली होती.

मुंबई : खासगी कंपनीच्या व्हॅनमधून एटीएम मशिनमध्ये भरणा करण्यासाठी निघालेली एचडीएफसी बँकेची ३० लाखांची रोकड दरोडेखोरांनी मागे सोडली होती. त्यांनी १ कोटी ६५ लाखांची रोकड चार बॅगांमध्ये भरली. मात्र व्हॅनमधील उर्वरित रोकड भरण्यासाठी त्यांच्याकडे बॅग नव्हती. त्यामुळे त्यांनी ही रोकड मागे सोडली. मात्र त्यावर कटात सहभागी असलेला चालक तारिक रेहमतुल्ला खान याने डल्ला मारला.गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटचे वरिष्ठ निरिक्षक दिपक फटांगरे आणि पथकाने या दरोडयातील एकूण ७ आरोपींना गजाआड केले आहे. सोबत लुटलेली १ कोटी ९५ लाखांपैकी १ कोटी ७९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात युनीट अधिकाऱ्यांना यश आले आहे.या दरोडयाच्या कटात सिक्युरीटी ट्रान्स इंडिया कंपनीचा गार्ड सद्रेआलम शोहरतअली खान, खुर्शिद अब्दुल शेख आणि व्हॅन चालक तारिक सहभागी होते. एटीएम मशिनमध्ये रोकड भरणा करण्याचे कंत्राट या कंपनीकडे आहे. १६ जानेवारीला एचडीएफसी बँकेची २ कोटी १३ लाखांची रोकड घेऊन कंपनीची व्हॅन मीरारोडच्या दिशेने निघाली होती. ती विलेपार्ले येथे लुटण्यात आली.खुर्शिद हा मुख्य आरोपी आहे. चार महिन्यांपुर्वी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागलेल्या खुर्शिदने सद्रेआलम व तारिकला नोकरीला लावले. ठरलेल्या कटानुसार चहात गुंगी आणतील अशा गोळया मिसळून त्या व्हॅनमधील गार्ड व रोकडीची जबाबदारी असलेल्या कस्टोडीयनला पाजून लूटमार करायची. त्या दिवशी तारिक व्हॅन चालवत होता. सद्रेसोबत बसर हसन अहमद खान गार्ड म्हणून तर कस्टोडीयन धर्मेश पेडामकरही व्हॅनमध्ये होते. ठरल्याप्रमाणे वरळीत थर्मासमध्ये आणलेला गुंगी आणणारा चहा पेडामकर, बसर यांना पाजण्यात आला. तसेच संशय येऊ नये म्हणून कटात सहभागी असलेल्या तारिकलाही पाजण्यात आला. मात्र तारिकचा कप आधीच ठरलेल्या कटानुसार अर्धाच भरलेला होता. पेडामकर, बसर वांद्रे येईपर्यंत बेशुद्ध पडतील, असा अंदाज होता. (प्रतिनिधी)