शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत कॅशव्हॅनमधून भरदिवसा ३० लाख लंपास

By admin | Updated: February 8, 2017 20:50 IST

मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली

ऑनलाइन लोकमतमिरज, दि. 8 - मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी भरदिवसा झालेल्या चोरीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रयशिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.शनिवार पेठेतील सतारमेकर गल्लीत स्टेट बँकेचे एटीएम आहे. दुपारी एक वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एसआयएस या एजन्सीचे तीन कर्मचारी जीपमधून (क्र. एमएच 10 बी 558) आले. एटीएममध्ये दहा लाख रुपये भरण्यासाठी बाबासाहेब कांबळे, प्रशांत काटकर, दिगंबर धुमाळ (रा. सांगली) हे कर्मचारी गेले. उर्वरित 30 लाखांची रक्कम असलेली बॅग त्यांनी जीपमध्येच ठेवलली होती.तिघेही कर्मचारी गेल्याची संधी साधून रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपची काच फोडून 30 लाखांची रक्कम असलेली बॅग चोरून नेण्यात आली. काच फुटल्याचा आवाज आल्याने येथील दुकानदार दिलीप चौगुले यांनी पाहिले असता जीपच्या खिडकीतूनहात घालून बॅग चोरून नेताना एक चोरटा त्यांना दिसला. त्यांनी आरडाओरडा करून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा बॅग घेऊन थोड्या अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसला आणि दोघे महावितरण कार्यालयाच्या दिशेने पळून गेले.भरदिवसा 30 लाखाची रोकड लंपास झाल्याच्या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी पाहणी केली. खासगी एजन्सीमार्फत स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यात येतात. सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून 60 लाख रुपये घेऊन शनिवार पेठेसह तीन ठिकाणी एटीएममध्ये 30 लाख रुपये भरण्यात आले होते. उर्वरित 30 लाखाच्या रखमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. 30 लाख रुपये गाडीत ठेवून एजन्सीचे तिन्ही कर्मचारी एकाचवेळी एटीएमकडे गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. याप्रकरणी कंपनीचा कर्मचारी दिगंबर महादेव धुमाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली असून चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीभरदिवसा एवढी मोठी रक्कम पळवण्याचा प्रकार गंभीर असून सराईत चोरट्यांचे हे कृत्य असल्याचा संशय पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केला. चोरट्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.परप्रांतीय टोळीकडून चोरीचा अंदाजएजन्सीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांकडे संशयावरून पोलिसांनी कसून चौकशी केली. तिघांना तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्या चौकशीत धागेदोरे सापडले नाहीत. आंध्रप्रदेश किंवा तेलंगणा राज्यात वाहनांच्या काचा फोडून रोख रोकड चोरी करणाऱ्या टोळ्या आहेत. अशा परप्रांतीय टोळीने एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या वहनावर पाळत ठेवून रकमेवर डल्ला मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.सीसीटीव्ही फुटेजवरून शोध सुरूचोरटे गणेश तलावाकडून शनिवार पेठेपर्यंत आल्याने या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चित्रण झाले आहे काय, याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. घटनास्थळासमोर इंडियन म्युझिकल शॉप या दुकानातील सीसी टीव्हीत जीपमधील बॅग चोरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांचे चित्रण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.