शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील ३० कुटुंबे वाळीत

By admin | Updated: January 19, 2016 03:46 IST

परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने येथील ३० कुटुंबे वाळीत टाकली असून त्यांना समाजातील कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे.

नाशिक : परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने येथील ३० कुटुंबे वाळीत टाकली असून त्यांना समाजातील कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे. त्यात परभणीच्या मोरे दाम्पत्याचा समावेश आहे. मोरे कुटुंबाने नाशिकमध्ये आसरा घेतला असून त्यांना धमक्या येत आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. परभणीतील सेलू येथील दीपक मोरे व त्यांची पत्नी सोनी यांनी गोंधळी समाजाच्या पंचांकडून भिशीच्या स्वरूपात ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडताना त्यांनी मूळ रकमेच्या तीनपट व्याज भरले. प्रत्येक वसुलीच्या वेळी पंचांना मद्य-मांसाहाराचा पाहुणचारही केला. मात्र त्यानंतरही कर्ज तसेच होते. पंचांनी सहा लाखांची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी पंचांनी घरात घुसून सोनी मोरे यांच्याशी असभ्य वर्तन केले. घराच्या दरवाजावर त्यांना बहिष्कृत केल्याची खूण म्हणून चप्पल बांधली, असे चांदगुडे यांनी सांगितले.पंचांनी मोरे यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, घराचे पत्रे काढून नेले. त्याला घाबरून मोरे कुटुंबाने गावातून पळ काढत नाशिक गाठले व नातेवाईक सुभाष उगले यांच्याकडे आसरा घेतला. मात्र पंचांनी उगले यांनाही धमक्या दिल्या. त्यांना परभणीहून ‘वाळपत्र’ पाठवून समाजातून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे उगले व मोरे आता पोलिसांत जाण्याच्या तयारीत आहेत. मोरे हे नाशिकमध्ये स्वच्छता कामगार म्हणून तर त्यांची पत्नी जुने कपडे विकण्याचे काम करते. (प्रतिनिधी)