शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी उत्पादकांच्या ३० कंपन्या

By admin | Updated: April 4, 2016 03:03 IST

उत्तम दर्जाच्या भेंडीचे उत्पादन करणाराजिल्हा म्हणून नावारूपाला येत असतानाच आता ठाणे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेउत्तम दर्जाच्या भेंडीचे उत्पादन करणाराजिल्हा म्हणून नावारूपाला येत असतानाच आता ठाणे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या ३०कंपन्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत ७४० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दलालमुक्त आणि आडतेमुक्त होण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन उत्पादन परदेशात पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांतील हवामान व माती भेंडीसाठी उत्तम आहे. याशिवाय, भेंडीला देशातील सर्वच राज्यांतून मागणी आहे, पण जागतिक पातळीवरील आखातासह अन्यही देशांत शहापूर व मुरबाडमधील भेंडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यामुळे या भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात ३० कंपन्या उभ्या करण्यात येणार आहेत. यातील सुमारे आठ कंपन्यांची नोंदणीही झाली असल्याचे जंगटे यांनी सांगितले.शहापूर व मुरबाडमध्ये एक हजार १०० एकरांवर भेंडीचे पीक घेतले जाते. त्यातील बहुतांशी भेंडी आखाती देशांसह युरोपात निर्यात केली जाते. भेंडी निर्यातीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी या उत्पादक शेतकऱ्यांना कंपन्यांमध्ये विभागले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मँगोनेट, व्हेजनेट व फायटोसॅनिटरी अ‍ॅथॉरिटीच्या बळकटीकरणाद्वारे निर्यातीस प्रोत्साहन मिळत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ही योजना लागू झाली आहे. त्याद्वारे भेंडीची निर्यात करण्यासाठी निवड झाली आहे. या ३० कंपन्यांद्वारे २३० हेक्टर शेतजमिनीवर भेंडीचे दर्जेदार पीक घेण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. शेती, कुशल मजूर, मुबलक पाणी आणि पोषक हवामानाची नैसर्गिक देणगी या दोन तालुक्यांना मिळाली आहे. यासाठी बी-बियाणे, कीटकनाशक, कीड व रोगमुक्त भेंडीच्या उत्पादनाची हमी असल्यामुळेच कृषीविभाग या शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमध्ये समाविष्ट करीत आहे. कमी उत्पादनात त्यांना जास्त पैसा मिळणार आहे.