शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ६२२ पशुधनाचा ‘लम्पी’मुळे झाला मृत्यू; ३२ जिल्ह्यांमध्ये दिसून आला प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 07:10 IST

सरकारी आणि खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशींचा अवलंब करावा.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार ४०४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ७६ हजार ९२७ बाधित पशुधनापैकी एकूण ४३ हजार ९२ पशुधन उपचाराद्वारे  रोगमुक्त झाले आहेत.  उर्वरित बाधित पशुधनांवर उपचार सुरु आहेत तर राज्यात लम्पी आजारामुळे आतापर्यंत एकूण ३ हजार ६२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

सरकारी आणि खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशींचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांचा औषधोपचार व लसीकरण करावे, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. लम्पी रोगाची लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी लम्पी आजाराच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा, असे सिंह यांनी सांगितले.

८७.०६ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्णराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १२८.०१ लाख लस मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामधून एकूण १२१.८१ लाख पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, धुळे, अकोला, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या माहितीनुसार, राज्यात सुमारे ८७.०६ टक्के पशुधनाचे लसीकरण झाले आहे.