शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी पुलाच्या 3 मार्गिका 2020 मे अखेरपर्यंत खुल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:02 IST

कल्याणकरांच्या दृष्टीने दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा असून गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे.

कल्याण : मुंबई - ठाण्याला जाण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नव्या दुर्गाडी पुलाच्या सहापैकी 3 मार्गिकांचे काम हे येत्या मे 2020 पर्यंत पूल होईल अशी माहिती एमएमआरडीएतर्फे देण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नव्या दुर्गाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

कल्याणकरांच्या दृष्टीने दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा असून गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. त्यामूळे यामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. दुर्गाडी चौक आणि वाहतूक कोंडी हे गेल्या काही महिन्यांपासून अविभाज्य समीकरण बनले आहे. बऱ्याचदा तर याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सहजानंद चौक, आधारवाडी चौकापर्यंत परिणाम झालेला पाहायला मिळतो.

या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच सध्या सुरू असणाऱ्या पुलाच्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले. तर येत्या 31 मे 2020 पर्यंत या सहापदरी किमान 3 मार्गिका तरी सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 3 महिने पुलाचे काम मागे पडले. परंतु आम्ही युद्ध पातळीवर काम करत असून डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण पुलाचे काम पूर्ण करण्याचा होणार असल्याचे 'एमएमआरडी'चे अधिकारी यांनी सांगण्यात आले. 

दरम्यान, या पुलाबाबत आतापर्यंत दिलेल्या कोणत्याही डेडलाईन एमएमआरडीएने पाळल्या नसून मे 2020 ची डेडलाईन तरी ते पूर्ण करतात का लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :kalyanकल्याण