मुंबई : अन्य रेल्वे विभागांमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे करंट बुकिंग तीन दिवस अगोदर मिळत असतानाच आता कोकण रेल्वेवरही ही सेवा देण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरपासून कोकण रेल्वे स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे स्थानके आणि जेटीबीएसवर (जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा) मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे करंट बुकिंगही त्याच दिवशी एक तास अगोदरच मिळत होते. त्यानंतर तीन दिवस अगोदर करंट बुकिंग देण्याची सोय अन्य रेल्वे मार्गांवर सुरू करण्यात आली. मात्र कोकण रेल्वेमार्गावर ही सुविधा त्याच दिवशी एक तास अगोदर देण्यात येत होती. आता कोकण रेल्वेमार्गावरील तिकीट खिडक्यांवर आणि जेटीबीएसवर तीन दिवस अगोदर करंट बुकिंग दिले जाणार असून, त्याची अंमलबजावणी २६ सप्टेंबरपासून केली जाईल. २00 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासासाठी ही सेवा असेल, असे सांगण्यात आले. सध्या कोकण रेल्वेमार्गावर ४ ठिकाणी जेटीबीएस सुरू असून, अन्य चार ठिकाणी जेटीबीएस सेवाही सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
‘कोरे’चेही ३ दिवस आधी करंट बुकिंग
By admin | Updated: September 24, 2014 05:24 IST