शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

लंडनमध्ये शुक्रवारपासून ३ दिवस मराठी संमेलन

By admin | Updated: June 1, 2017 01:07 IST

महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने २ ते ४ जून या काळात लंडन मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत

लोकमत न्यूज नेटवर्कलंडन : महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने २ ते ४ जून या काळात लंडन मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रीयनांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हा मोठा पुढाकार आहे. लंडनमधील कॅनडा स्क्वेअरच्या कॅनरी व्हर्फ येथे ३९ व्या मजल्यावर होणाऱ्या या संमेलनात भारताबरोबरच ब्रिटनमधील मंत्री व प्रतिष्ठित उद्योजकही सहभागी होणार आहेत. इंग्लंडच्या प्रादेशिक सैन्याचे कमोदोर डेव्हिड एल्फोर्ड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी माणसाचे यश, सिद्धी आणि भरभराट साजरा करण्यासाठी होणाऱ्या या संमेलनात कौशल्य, संगीत, कला, सर्जनशीलता यांचे दर्शन घडेल. दुबई, अमेरिका, भारत व अन्य देशांतील मराठी उद्योजकांचा सत्काराबरोबरच संगीत, विनोद असे कार्यक्रम तर असतीलच, शिवाय स्वादिष्ट मराठी जेवण व विविध क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या ३३ मराठी नामवंतांशी गप्पांचाही कार्यक्रम असेल. जन्मभूमीची जाणीव रुजविणे, मराठी माणसांना एकत्र आणणे, मराठी संस्कृतीचा पेटारा पुन्हा उलगडणे आणि येणाऱ्या पिढीला मी मराठी असल्याची जाणीव करून देणे, हे या संमेलनाचे उद्दिष्ट आहे.  अनेक मराठी तारे-तारकांची उपस्थितीसयाजी शिंदे, मोहन आगाशे, भार्गवी चिरमुले, नंदेश उमप, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, समीर चौगुले, सिद्धार्थ कदम हे या संमेलनाला हजर राहणार असून, स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रमही तिथे होतील. क्रूझमधून टेम्स नदीची सफर हा कार्यक्रम आणि या गोजिरवाण्या घरात या नाटकाचा प्रयोग हेही संमेलनाचे वैशिष्ट्य असेल. युरोप व इंग्लंडमधून १३00 मराठी लोक संमेलनाला येणार आहेत.