अकोला: पदाचा दुरूपयोग करून बँकेत बनावट खाते उघडून त्यामध्ये सबसिडीचे धनादेश जमा करून २९ लाख बळकावल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सेंट्रल बँकेचे अधिकारी प्रकाशचंद्र छोटेलाल अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक चंद्रकांत रामकृष्ण मांगलेकर यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सेंट्रल बँकेच्या जठारपेठ शाखेचे एसडब्लूओबी पदावर कार्यरत प्रकाशचंद्र छोटेलाल अग्रवाल याने पदाचा दुरूपयोग करून बँकेत अनेक बनावट नावांनी खाते उघडले आणि या खात्यांमध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून मिळालेल्या सबसिडीचे धनादेश जमा करून त्यातील २९ लाख रुपयांची रक्कम हडपली. या प्रकरणी प्रकाशचंद्र अग्रवाल यांच्याविरूद्ध ४२0, ४६८, ४७१, ४0९ नुसार गुन्हा दाखल केला.
सबसिडीचे २९ लाख बळकावले
By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST