शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

राज्यांतील २८,५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 05:42 IST

चारा छावण्यांमध्ये तब्बल ६ लाख जनावरे : महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २५ टक्के पाणी शिल्लक

- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तब्बल २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ असून, ९ जिल्ह्यांत सुरू झालेल्या ९४६ चारा छावण्यांत सुरू तब्बल ६ लाख जनावरे आली आहेत, तसेच ९,६६० गावे, वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी असताना ही भीषण स्थिती आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर स्थलांतराची वेळ येईल, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय नेते, मंत्री मात्र निवडणूक प्रचारात मग्न आहेत.

आचारसंहितेमुळे बोलणे नाही, पण परिस्थिती भीषण आहे, असे सांगून अधिकारी म्हणाला की, ३० आॅक्टोबर रोजी सरकारने १७,९८५ गावे दुष्काळग्रस्त घोषित केली. त्यात सतत वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारी रोजी ४,५१८ गावे त्यात समाविष्ट केली. पाण्याची, चाऱ्याची टंचाई असताना अन्नधान्याची जुळवाजुळव करण्याचे नियोजन कोलमडले आहे. तीन महिन्यांचा साठा करून ठेवावा, असा नियम असताना एफसीएकडून लागेल तसा माल मागवून दिवस ढकलला जात आहे. धान्याची गोदामे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असून, आचारसंहितेमुळे त्यावर त्यांचेच नियंत्रण आहे. अहमनदगर, सातारा, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या नऊ जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाण्याचा दुष्काळ मात्र सर्वत्र आहे. काही भागांत आताच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे.

या जिल्ह्यांत पशुसंवर्धन व महसूल विभाग, तसेच स्वयंसेवी संस्थांकडून ९४६ चारा छावण्या चालविल्या जात आहेत. यात सध्या ६,०१,४८१ जनावरे आहेत. चारा छावण्यांची मागणी वाढूनही त्यांना लवकर मंजुरी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बीड जिल्ह्यात फारच वाईट स्थिती असून, तिथे ३,४२,७५७ जनावरे छावण्यांमध्ये आहेत.कोकणातील पाच जिल्ह्यांत ४२, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत ६७५, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत ५१३, औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत २०६३, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १२६ टँकर चालू आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मात्र सध्या एकही टँकर नाही.केंद्राकडून पूर्ण मदत नाहीचराज्याच्या २८ हजार गावांमधील सुमारे ८२,२७,१६६ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात असून, ८५ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळाखाली आहे. सरकारने ३१ मार्चपर्यंत ६७,३०,८६५ शेतकºयांच्या बँक खात्यात ४,४१,२५७ लाख रुपये निधी जमा केला आहे. केंद्राने राज्याला ७,२१४ कोटींची मदत जाहीर केली होती. त्यापैकी ४,७१४ कोटी मिळाले असून, ३,२४८ कोटी रुपये मिळणे बाकी आहे.