शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

राज्यातील २८ आरटीओ कार्यालयाल ट्रॅक विना

By admin | Updated: October 21, 2016 17:14 IST

राज्यातील २८ आरटीओ कार्यालयाला वाहनांना फिटनेस तपासण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे फिटनेस न तपासता प्रमाणापत्र दिले जाते

हर्षनंदन वाघ

बुलडाणा, दि. २१ :  राज्यातील २८ आरटीओ कार्यालयाला वाहनांना फिटनेस तपासण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे फिटनेस न तपासता प्रमाणापत्र दिले जाते. त्यामुळे अपघातात वाढ होत असल्यामुळे लवकरच प्रत्येक आरटीओ कार्यालयासाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात एकूण ५० आरटीओ कार्यालये आहेत. त्यातील २२ आरटीओ कार्यालयाकडे ट्रॅकसाठी जागा असून इतर २८ आरटीओ कार्यालयाकडे ट्रॅकसाठी जाता नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र योग्य प्रकारे दिले जात नाही.

वाहनांचे बे्रक आदी तपासणीसाठी राज्यातील काही आरटीओ कार्यालयाकडे जागा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या फिटनेसची तपासणी न करताचिरीमिरी घेवून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. अनेक ठिकाणी चालविण्यायोग्य  वाहन नसताना फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या उत्तरात शासनाने वाहन तपासणीसाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयाला स्वतंत्र ट्रॅक देण्यात असल्याचे प्रतिज्ञापत्र मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केले. तसेच ज्या आरटीओ कार्यालयासला स्वतंत्र ट्रॅकसाठी जागा नाही. त्यांना ट्रॅकसाठी जागा उपलब्ध करूनदेण्यासाठी जिल्हाधिकारी मदत करणार असून जागा शोधल्यानंतर ती जागा संपादीत करणार असून यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञपत्रात नमूद केल आहे.आरटीओची कागदपत्रे संगणकीकृतप्रत्येक प्रशासकीय विभाग संगणकीकृत होत असून राज्यातील आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे.  यासाठी कर्मचारी वर्गासह वाहन निरीक्षकांची १४८ पदे मंजूर करण्यात आली असून लवकरच एमपीएससीव्दारे सदर पदे भरण्यात येणार आहे.बुलडाण्यातील ट्रॅकसाठी प्रस्ताव सादरबुलडाणा येथील आरटीओ कार्यालयालसाठी बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाच्या सुरवातील स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. या कार्यालयपरिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असूनही वाहनांचे फिटनेससाठी ट्रॅक उपलब्ध नाही. सदर कार्यालय परिसरात स्वतंत्र ट्रॅकसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.बुलडाणा आरटीओ कार्यालयाकडे स्वतंत्र ट्रॅक उभारणीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र ट्रॅक उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव प्रशाससनाकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ट्रॅक उभारण्यात येईल. -अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा