शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २८ लाख टन ऊस शिल्लक

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे

कोल्हापूर : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिला आहे. राज्यातील साखर कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी पुण्यात झाली. यामध्ये ‘एफआरपी’मधील ८० टक्के व २० टक्के किती कारखान्यांनी दिले, त्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७२२.८० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन कसे केले, याची माहितीही आयुक्त बिपीन शर्मा यांनी घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण तडजोडीनुसार ८०:२० फॉर्म्युला मान्य केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे द्या. फेब्रुवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाला ताबडतोब ८० टक्क्यांप्रमाणे पैसे द्या. त्याचबरोबर ज्या कारखान्यांचा हंगाम संपला आहे, त्यांनी १५ एप्रिलपर्यंत उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे आदेश शर्मा यांनी बैठकीत दिले. निर्यातीस टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही शर्मा यांनी दिला. (प्रतिनिधी) निर्यात अनुदान लवकरच!साखर निर्यातीवर केंद्र सरकार प्रतिटन ४५ रुपये अनुदान देणार आहे. ते देण्यास विलंब होत असला, तरी लवकरच संबंधितांना मिळणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी बैठकीत सांगितले. शिल्लक उसाच्या गाळपाचे आव्हानचालू साखर हंगामात सुरू असलेल्या १७७ पैकी १३२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. ४५ कारखान्याने सुरू असून, त्यांच्यापुढे अजून २८ लाख टन ऊसगाळप करण्याचे आव्हान आहे. जवळपास ३० हजार हेक्टर ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे.