शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२७० वाळू साठ्यांचे प्रस्ताव

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील तहसीलदारांकडून २७० वाळूसाठ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ पुढील

गौण खनिज: ग्रामसभांचे ठराव घेणार; १८ वाळू साठ्यांचीच विक्रीअहमदनगर : जिल्ह्यातील तहसीलदारांकडून २७० वाळूसाठ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया करून लिलावासाठी आॅनलाइन बोली लावली जाणार आहे़नगर जिल्ह्यातील पाथर्डी व नगर तालुका वगळता इतर १२ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळू आहे़ नदीपात्रातील वाळू पट्टयांची विक्री करण्यासाठी आॅनलाइन बोली लावण्यात येते़ ठेकेदार बोली लावतात़ सर्वाधिक बोली बोलणाऱ्यांना वाळू पट्टा दिला जातो़ त्यानंतर त्याला वाळू उपसता येते़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार मागील वर्षी ३०४ पैकी १८ वाळू पट्टयांचीच फक्त विक्री झाली़ उर्वरित वाळूसाठ्यांची विक्री झाली नाही़ चालू आर्थिक वर्षात वाळू पट्टयाची विक्री करण्याची प्रक्रिया गौण खनिज विभागाने सुरू केली असून, तहसीलदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत़ महिनाभरात २७० प्रस्ताव दाखल झाले आहेत़ तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नदीपात्राचे सर्वेक्षण करण्यात येते़ त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वाळू विकायची किंवा नाही, यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते़ ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय पर्यावरण समितीसमोर सादरीकरण केले जाते़ समितीत चर्चा होऊन अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हास्तरीय प्राधिकरणकडे पाठविण्यात येतात़ प्राधिकरणकडून मंजुरी मिळाल्यानंतर वाळूसाठी आॅनलाइन बोली लावली जाणार आहे़मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३४ वाळू साठ्यांची घट झाली असून, त्याची कारणे भूजल सर्वेक्षण विभागाकडून शोधली जाणार आहेत. त्यात ही संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)