शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ विद्यार्थी संशयाच्या घे-यात!

By admin | Updated: February 28, 2017 01:59 IST

सैन्य भरती पेपर फूट प्रकरण

सचिन राऊत अकोला, दि. २७-सैन्य भरतीसाठी रविवार, २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकणार्‍यांमध्ये जिल्हय़ातील कानशिवणी येथील करिअर अकॅडमीचे संचालक अडकल्याने या अकॅडमीत प्रवेशित असलेले २७ विद्यार्थी आता संशयाच्या घेर्‍यात अडकल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या अकॅडमीचे संचालक सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कानशिवणी येथे सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मालकीची आणि संचालीत असलेली करिअर अकॅडमी आहे. या अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात येतात. यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राज्य राखीव दल, सैन्यदल, इंडो तिबेट पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल यांसह पोलीस भरतीच्या उमेदवारांचे निवासी आणि अनिवासी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येते. जिल्हय़ातील शेकडो विद्यार्थी या करिअर अकॅडमीमध्ये प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना नोकरी लावून देण्याची हमी घेण्यात येत होती. अशातच अकॅडमीचे संचालक निर्मळे यांना पेपर फोडल्यानंतर अटक केल्याने ही अकॅडमी आता संशयाच्या कैचित अडकली आहे. या अकॅडमीचे शेकडोपैकी २७ विद्यार्थी २६ फेब्रुवारीच्या लेखी परीक्षेची तयारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बाहेरगावी गेल्याचेही खात्रीलायक वृत्त असून, त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. सुभाष निर्मळे यांना अटक झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात सापडले आहे.नोकरी देण्याची हमीअकोला तालुक्यातील कानशिवणी येथील सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला सैन्यात नोकरी देण्याची हमी देण्यात येत होती, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रात नोकरीची हमी देण्यात येत असल्याने शेकडो विद्यार्थी प्रवेशित होते. यामधील २७ विद्यार्थी या घोटाळय़ामुळे संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत.प्रशिक्षण केंद्र रडारवरसैन्य भरतीचे लेखी पेपर परीक्षेपूर्वीच फोडणार्‍यांमध्ये आणि सौदेबाजी करणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक निघाले आहेत, त्यामुळे राज्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आता रडारवर आले आहेत. या प्रशिक्षण केंद्रांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती आहे. अकोला जिल्हय़ातील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांची लवकरच तपासणी होणार आहे.