शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा नवा वाद

By admin | Updated: September 10, 2015 04:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार

- सरकार व निवडणूक आयोगात संघर्ष

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यात संघर्षाची ठिणगी टाकणारा ठरणार आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार महापालिका निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाने सरकारच्या निदर्शनास आणली आहे. मात्र प्रशासक नेमून निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याच्या पवित्र्यात राज्य सरकार असल्याचे समजते.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीलगतच्या २७ गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला होता. मात्र या गावांचा समावेश केल्याचा राजकीय लाभ शिवसेनेला होईल, ही बाब कालांतराने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी निदर्शनास आणल्यामुळे दोन दिवसांपूर्वी ही गावे वगळण्याचा निर्णय नगरविकासने काढला होता. महापालिकेची मुदत ११ नोव्हेंबर २०१५ रोजी संपत आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढे ढकलता येत नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर एस. सहारिया यांनी सरकारच्या निदर्शनास आणली आहे. सरकारने गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयापासून घूमजाव केल्यावर पुन्हा हरकती व सूचना मागवून त्याची सुनावणी करणे यासारख्या प्रक्रिया करण्यास पुरेसा कालावधी नसल्याने सरकारला आयोगाचे म्हणणे स्वीकारणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गावे समाविष्ट करून वगळण्याची तांत्रिक चूक भाजपाला राजकीयदृष्ट्या महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (विशेष प्रतिनिधी)राज्यघटनेत सहा महिन्यांकरिता प्रशासक नेमण्याची तरतूद असून, त्याची अंमलबजावणी सरकार करू शकते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा आग्रह कायम ठेवलाच तर २७ गावांसह निवडणूक होईल व त्यानंतर पुन्हा या २७ गावांच्या नगरपालिकेकरिता निवडणूक होऊ शकते, असे सरकारमधील उच्चपदस्थांनी सांगितले.