शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात २७ लाखांचा गुटखा पकडला

By admin | Updated: August 26, 2016 19:25 IST

नांदेड रोडवरील कोळपा शिवारात असलेल्या एका ढाब्यावर थांबलेल्या ट्रकचालकास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले. दरम्यान, ट्रकचालकाची अधिक चौकशी केली

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 26  -  नांदेड रोडवरील कोळपा शिवारात असलेल्या एका ढाब्यावर थांबलेल्या ट्रकचालकास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले. दरम्यान, ट्रकचालकाची अधिक चौकशी केली असता ट्रकमध्ये तब्बल २७ लाख ५४ हजारांचा गुटखा वाहतूक करत असल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. राजकुमार सुरजराम मिना (३२ रा. अत्तापूर हैदराबाद) हा हैदराबाद येथून आपल्या (एम. एच. ४३ वाय ५२५१) या टेम्पोतून गुटखा वाहतूक करत होता. दरम्यान तो शुक्रवारी पहाटे कोळपा येथील एका ढाब्यावर थांबला होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यास हटकले. यावेळी तो उडवाडवीची उत्तरे देत होता. यावरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत ४० पोत्यांतून तब्बल २७ लाच ५४ हजारांचा गुटखा विक्रीसाठी घेवून जात असताना चालकास अटक करण्यात आली. हा गुटखा कोणाच्या सांगण्यावरुन तो वाहतूक करत होता. याचा मात्र, पोलिसांना अद्याप शोध घेता आला नाही. हैदराबाद येथून हा गुटखा आपण आपल्या मालकाच्या सांगण्यावरुन घेवून जात असल्याचे त्याने सांगितले. लातुरात आल्यानंतर आपल्याला कोणाच्या ताब्यात हा गुटखा द्यायचा याबाबत सांगितले जाणार होते. त्यांच्याच निरोपाची वाट पाहत आपण कोळपा येथील ढाब्यावर थांबालो होतो, असे आरोपी चालक राजकुमार मीना याने पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह तब्बल एकूण ३७ लाख ५४ हजारांचा मुद्देमला जप्त केला आहे.सहज हटकल्याने फुटले बिंग...ढाब्यावर थांबलेल्या त्या टेम्पोचालकाला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सहज हटकल्यानंतर आलेल्या संशयावरुन २७ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करीचे बिंग फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा घेवून निघालेल्या वाहनाची पोलिसांना मात्र साधी खबरबातही नव्हती.  योगायोग म्हणजे सहज हटकल्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ््यात अडकला.