शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२७ दिवसांनतर आदिवासी महिलेचा मृतदेह सापडला; पतीविरुध्द खुनाचा गुन्हा

By admin | Updated: August 31, 2016 18:48 IST

तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील रखवालदार आदिवासी वृध्देचा मृतदेह तब्बल २७ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत याच परिसरात आढळून आला.

ऑनलाइन लोकमत

संग्रामपूर, (जि.बुलडाणा), दि. 31 - तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील रखवालदार आदिवासी वृध्देचा मृतदेह तब्बल २७ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत याच परिसरात आढळून आला. याप्रकरणी मंगळवारी रात्री सोनाळा पोलिसांनी मृतकच्या पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. सोनाळा येथील टिन्नू वर्मा यांच्या पिंगळी शिवारातील शेतात मधूकर भास्कर हे आदिवासी कुटुंब रखवालदार म्हणून आहे. या कुटुंबातील कलाबाई मधूकर भास्कर (वय ६०) ह्या पतीसोबत भांडण झाल्याने गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने २७ आॅगस्ट रोजी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली होती. दरम्यान ह्या बेपत्ता असलेल्या वृध्देचा मृतदेह २७ व्या दिवशी कुजलेल्या व अवयव विखुरलेल्या अवस्थेत २९ आॅगस्टच्या रात्री १० वाजेदरम्यान शेतात जात असताना कैलास गुजर नामक शेतक-याला दिसून आला. सदर शेतक-याने सोनाळा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सोनाळा पोलिस स्टेशनचे ३० पोलिसांचे पथक तसेच डिवायएसपी राजेंद्र साळुंके यांनी रात्री १० वाजताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी मंगळवारी रात्री वृध्द महिलेचा पती मधूकर भास्कर याचेविरुध्द कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस शोध घेत आहेत. तपास डिवायएसपी राजेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुनिल बडगुजर करीत आहेत. 

लोकमतने प्रसिध्द केले होते वृत्त
सदर महिला बेपत्ता झाल्यानंतर तिचे वस्त्र पिंगळी शिवारातील एका शेतात सापडले होते. यानंतर बेपत्ता झाल्याच्या २२ दिवसांनी याप्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मुलाने दिली होती. याबाबत लोकमतने रोजीच्या अंकात ‘रखवालदाराच्या पत्नीचे बेपत्ता होण्याचे गूढ कायमच ! ’ या आशयाचे वृत्त २८ आॅगस्ट रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते. सदर वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सदर महिलेचा मृतदेह आढळून आला तसेच याप्रकरणी आरोपी मृतकच्या पतीविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.