शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

किसान सभेचा २६ रोजी देशव्यापी ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:29 IST

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट

- लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २६ जुलै रोजी देशव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सकाळी अकरा वाजता सहा ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. किसान सभेची राज्य कौन्सिलची बैठक मनमाड, तर राष्ट्रीय कौन्सिलची बैठक जगन्नाथपुरी येथे झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. देशात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असून, यासाठी शेतकऱ्यांची सरकारी, सहकारी व खासगी कर्जे माफ करावीत. स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमजुरांना दरमहा पेन्शनचा कायदा करावा, आदी मागण्यांसाठी देशव्यापी संप केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली पुलाची, कसबा बीड, कळे, गारगोटी, कळंबा, इचलकरंजी या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.