शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२६५ कंत्राटी डॉक्टरांना केले बडतर्फ

By admin | Updated: July 7, 2014 03:48 IST

पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणाच्या पवित्र्यात असणाऱ्या मॅग्मो संघटनेवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे.

मुंबई : पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणाच्या पवित्र्यात असणाऱ्या मॅग्मो संघटनेवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या २६५ डॉक्टरांना बडतर्फ केले आहे. तर १९४ डॉक्टर रविवारी कामावर रुजू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घ्या, अन्यथा जीवनावश्यक सेवा अनुरक्षण कायद्यांर्गत (मेस्मा) कारवाई होईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य विभागाने शनिवारी मॅग्मोला दिला होता. मात्र मॅग्मोने याकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरूच ठेवले आहे. सरकार मॅग्मोच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहात असताना ही मॅग्मो संघटना आंदोलन मागे घेण्याच्या तयारी दाखवत नसल्यामुळे आता सरकारने कडक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत विनाशर्त आंदोलन मागे न घेतल्यास मॅग्मोच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांना मेस्मा लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या चार वर्षांपासून मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मॅग्मो संघटना विविध स्तरावर आंदोलन करत होती. मात्र त्यांच्या ११ मागण्यांपैकी एकही मागणी अजून पूर्ण झालेली नाही. म्हणूनच १ जून रोजी मॅग्मो संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले होते. यानंतर ३ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तीन मागण्या मान्य करून १० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर मॅग्मोने आंदोलन स्थगित केले होते. मात्र १ महिना उलटूनही या मागण्या मान्य न झाल्यामुळे १ जुलैपासून मॅग्मोने काम बंद आंदोलन पुकारले आहे. पाच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मॅग्मोने घेतली असल्याचे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)