शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी २६ हजार कोटी

By admin | Updated: November 4, 2016 04:52 IST

राज्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणे तसेच लांबी वाढविण्याच्या दृष्टीने गुरुवारी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक झाली.

मुंबई : राज्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणे तसेच लांबी वाढविण्याच्या दृष्टीने गुरुवारी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. येत्या १५ वर्षात साधारण १० हजार किमी अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे तथा लांबी वाढविण्याच्या दृष्टीने साधारण २६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले.तालुक्याचे ठिकाण ते जिल्हा मुख्यालय, जिल्हा मुख्यालय ते महसुली विभागाचे ठिकाण आणि जिल्ह्याजिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. तसेच पर्यटनस्थळे, उद्योग आणि कृषी केंद्रांना रस्त्यांनी जोडण्याबरोबरच या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट असेल यावर प्राधान्याने लक्ष देण्यात यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण कामकाज आॅनलाइन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रस्त्यांचे अंदाजपत्रक बनविण्यापासून कंत्राटदारांना देयके देण्यापर्यंंतची सर्व प्रक्रि या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. रस्त्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जागांचा विकास करण्यासह इतर काही स्त्रोतांचा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.राज्यातील रस्त्यांचा विकास हा राष्ट्रीय महामार्गाच्या मानकानुसार करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आराखडा तयार केला असून प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी यावेळी त्याचे सादरीकरण केले.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, प्रधान सचिव व्ही. गिरीराज, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एल. मोपलवार आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी) >कामकाजात पारदर्शकता आवश्यकरस्त्यांचा दर्जा चांगला होण्याच्या दृष्टीने त्याचा डीपीआर तयार करण्यापासून निविदेच्या अटी ठरविणे, करारनामा करणे या सर्व कामकाजात पारदर्शकता आणि गांभीर्य आवश्यक आहे. रस्ते विकास करताना त्याच्या दर्जाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे तडजोड करु नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.