शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लवासासारखी २६ शहरे उभारणे शक्य- शरद पवार

By admin | Updated: June 24, 2014 15:13 IST

निसर्गसौंदर्याने नटलेल्या लवासासारख्या आणखी २६ साइट उभारता येऊ शकतील अशा जागा राज्यामध्ये आहेत.

पुणे : निसर्गसौंदर्याने नटलेल्या लवासासारख्या आणखी २६ साइट उभारता येऊ शकतील अशा जागा राज्यामध्ये आहेत. इंग्लंडप्रमाणो महाराष्ट्रातही अशी शहरे उभारून विकासाचा पुढचा टप्पा गाठता येऊ शकेल. या विकासाला विरोध करण्यासाठी उभ्या राहणा:या शक्तींना अवास्तव महत्त्व देऊ नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) 8क्व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी असोचॅमचे अध्यक्ष व येस बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक राणा कपूर यांना ‘एमसीसीआयए एक्सलंन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर चंचला कोद्रे, एमसीसीआयएचे अध्यक्ष एस.के. जैन उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘लवासा प्रकल्पाला दर शनिवार-रविवारी दहा हजार पर्यटक भेट देत आहेत, एक 
उत्तम पर्यटन सिटी म्हणून ते पुढे 
आले आहे. मात्र, लवासाला 
झालेल्या विरोधामुळे 3 ते 4 वर्षापासून कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. विकासाला विरोध करणा:या अशा शक्तींना अवास्तव महत्त्व दिले जाऊ नये.  लवासाप्रमाणो मुबलक पाणीसाठा असलेल्या आणखी 26 साइट राज्यात आहेत, त्या विकसित करता येऊ शकतील.’’या वेळी राणा कपूर, एस.के. जैन यांनी विचार व्यक्त केल़े (प्रतिनिधी)
 
गेल्या दहा वर्षात विक्रमी उत्पन्न
गेल्या दहा वर्षात केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात साखर, तांदूळ, फळे यांचे विक्रमी उत्पादन देशाने घेतले. साखर आणि तांदळाची सर्वाधिक निर्यात भारताने गेली. शेतीमालाचे भाव वाढले की, लगेच वर्तमानपत्रमध्ये माझे फोटो झळकायचे. 
अन्नधान्यावर प्रक्रिया करून ते निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अन्नधान्यांवर प्रक्रिया करण्याचे आंतरराष्ट्रीय हब म्हणून पुणो विकसित करता येऊ शकेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.