शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२५२ वर्षांपूर्वीचे हस्तलिखित!

By admin | Updated: January 5, 2015 04:29 IST

भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे.

भाऊसाहेब येवले, राहुरी (अहमदनगर) -भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ‘श्री भक्तीविजय’ असे ग्रंथाचे नाव असून ,महिपती महाराजांचे वंशज पांडुरंग कांबळे यांनी तो देवस्थान ट्रस्टकडे दिलेला आहे. १७६२मध्ये महाराजांनी लिहिलेल्या श्री भक्तीविजय ग्रंथामध्ये ५७ अध्याय असून, ९९१६ ओव्यांचा समावेश आहे़ बाजरीचे दाणे जाळून त्यापासून तयार केलेल्या शाईच्या साहाय्याने वळणदार अक्षरात ग्रंथनिर्मिती केली असल्याची माहिती संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांनी दिली़ पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवून महिपती महाराजांनी १५ गं्रथांची निर्मिती केली. महाराजांचे एकमेव हस्तलिखित ग्रंथ असल्याने त्याचे जतन करण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी सांगितले. संत तुकाराम महाराजांना गुरू माणून महिपती महाराजांनी संत चरित्र लिहिण्यास सुरुवात केली़ महाराजांनी उत्तर आयुष्यात २५ वर्षांत १५ गं्रथ लिहिले़ महाराजांना मराठी, संस्कृत, गुजराती, हिंदी व कानडी या पाच भाषा अवगत होत्या़ अमेरिकन ख्रिश्चन धर्म प्रचारक एडवर्ड अ‍ॅबर्ट यांनी भक्तीविजय, भक्तलीलामृत व संतविजय या गं्रथांचे इंग्रजीत अनुवाद करून महिपती महाराजांच्या साहित्याचा प्रसार सातासमुद्रापलीकडे केला आहे़