शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५०० कोटींचा फटका

By admin | Updated: October 19, 2015 02:25 IST

अवैध व चोरट्या वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला २,५00 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : अवैध व चोरट्या वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला २,५00 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे समोर आले आहे. ही वाहतूक रोखल्यास एसटीला भरघोस उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अशा वाहतुकीला आळा घालण्यात यावा, यासाठी शासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. एसटीकडूनही याकडे दुर्लक्षच होताना दिसते. एसटी महामंडळाकडे सध्या १७ हजार एसटी असून, वर्षाला ६७ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रवाशांचा हा आकडा पाहिल्यास वर्षभरात जवळपास ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे महामंडळाला चांगलाच फटका बसत आहे. सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटर्जी यांच्यासोबत एसटी महामंडळाची एक बैठक पार पडली. बैठकीत एसटीतील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात भारमान आणि उत्पन्नावरही चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, अवैध व चोरट्या वाहतुकीमुळे एसटीला मोठा फटका बसत असल्याची माहिती, अतिरिक्त मुख्य सचिवांना देण्यात आली. एसटीच्या आगार आणि स्थानकातून विनापरवाना धावणाऱ्या अवैध रिक्षा, टेम्पो, बस चालकांकडून प्रवाशांना नेण्यात येते, तसेच टुरिस्ट परमिट असलेल्या वाहनांकडूनही पॉइंट टू पॉइंट सेवा देत, एसटीचे प्रवासी नेतात. यामुळे एसटीला प्रत्येक वर्षी जवळपास अडीच हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २00४ मध्ये राज्यात टुरिस्ट परमिट असलेली ९४ हजार वाहने होती. हीच संख्या आता दीड लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या वाहनांकडून शासनाचे नियम पाळले जात नाहीत आणि शासनाकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अवैध वाहतुकीला आळा बसावा, यासाठी कठोर पाऊल शासनाकडून अद्याप उचलण्यात आलेले नाही. एसटी महामंडळाच्या दक्षता पथक व पोलिसांच्या सहकार्याने अवैध व चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केल्याचे नेहमीच सांगितले जाते. मग ही कारवाई होत असली, तर एवढे उत्पन्न एवढे बुडतेच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)