शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

2.50 लाख वृक्ष लावणार - कौशल्य विकास विभागाचा संकल्प

By admin | Updated: July 1, 2016 10:42 IST

राज्य शासनाच्या "हरीत महाराष्ट्र" अभियानात कौशल्य विकास विभागाच्या राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक माध्यमिक शाळा सहभागी होणार असून अडीच लाख वृक्ष लावण्यात येतील.

ऑनलाइन लोकमत
मुंबई - राज्य शासनाच्या "हरीत महाराष्ट्र" अभियानात शुक्रवारी कौशल्य विकास विभागाच्या राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक माध्यमिक शाळा सामील होत आहेत. परिणामी,आज प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांमागे एक झाड याप्रमाणे 2.50 लाख वृक्ष लागवड होणार आहे.
याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभाग राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरूवारी बैठक घेतली. यामध्ये संचालक दयानंद मेश्राम, सहसंचालक अ.म.जाधव, उपसंचालक योगेश पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी विजय महाजन उपस्थित होते. या अभियानाची सुरवात मंत्री महोदय यांच्या हस्ते अकोला व वाशिम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वृक्षारोपन करुन होणार आहे.  या कार्यक्रमांतर्गत लागवड करण्यांत आलेल्या सर्व रोपांचे वृक्षात परीवर्तन होण्यांसाठी त्यांचे संवर्धन व संगोपन करण्यांसाठी अनुसरावयाची प्रमाणित कार्यपध्दती संचालनालयामार्फत यापुर्वीच राज्यतील सर्व शासकीय तथा खाजगी औ.प्र.संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमांतर्गत लागवड करण्यांत आलेल्या वृक्षांना आवश्यक तो पाणीपुरवठा हा ठिंबक सिंचनाव्दारे करण्यांत येणार असून याकामी औद्योगिक आस्थापना, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यांत येणार आहे.  संस्थांत कार्यरत असणारे शिल्पनिदेशक / गटनिदेशक यापैकी सक्षम कर्मचाऱ्यांची  "वृक्षमित्र" म्हणुन निवड करण्यांत येवुन प्रादेशिक कार्यालय स्तरावर "वृक्षमित्र समन्वय" निवडून संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यांत येणार आहे.  
 राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व  तंत्र माध्यमिक शाळांच्या आवारात सद्यस्थितीत स्थापित असलेल्या वृक्षांची नोंदणी करुन त्याप्रमाणे  नविन वृक्षांची लागवड करुन जोपासना करता येईल या पध्दतीने जागा निवडून पुढील कार्यवाही करण्यांचे निर्देश देण्यांत आलेले आहेत.  सदर कार्यवाही करताना स्थानिक वातावरणात वृक्षांची योग्य प्रकारे वाढ होऊल ही बाब देखील विचारात घेवून वृक्षांची निवड करण्यांत येत आहे.
 शासकीय कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जड संग्रह नोंदवही (Dead Stock Register) प्रमाणे Tree Inventery Register तयार करण्यांत येवून सदर नोंदवही संस्थाप्रमुखांच्या कार्यलयात ठेऊन त्यामध्ये संस्थेच्या आवारात असलेल्या वृक्षांची नोंद घेतली जाणार आहे.