शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण हवे!

By admin | Updated: July 2, 2017 04:47 IST

क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रविभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाककडून भारताचा दारुण पराभव झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारत एक तगडा दावेदार होता. तसेच पहिल्या सामन्यात भारताने पाकचा एकतर्फी पराभव केला होता. असे असताना अंतिम सामन्यात भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जही माफ करण्यात यावे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.स्वतंत्र विदर्भासाठी २५ आॅगस्टपासून आंदोलन केंद्रात आणि राज्यात भाजपाच सत्तेवर आहे. तेव्हा भाजपाने आतातरी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत.स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रिपाइंची भूमिका स्पष्ट असून, येत्या २५ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.गोरक्षकांचा जो हैदोस सुरू आहे, त्याचा निषेध करीत गोवंश हत्या या शब्दातून ‘वंश’ हा शब्द काढण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोहत्येला प्रतिबंध करणाऱ्या जुन्याच कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.