शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्रावरील २५ टक्के कर्ज फिटेल !

By admin | Updated: March 30, 2016 03:19 IST

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा योग्य पद्धतीने पुनर्विकास केल्यास संबंधितांच्या मागण्या पूर्ण करूनही राज्याला तब्बल ७७ हजार कोटींचा आर्थिक लाभ होऊ शकतो. या रकमेतून राज्यावरील तब्बल एक चतुर्थांश

चंद्रकांत पाटील यांचा दावा : वांदे्र येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकासमुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा योग्य पद्धतीने पुनर्विकास केल्यास संबंधितांच्या मागण्या पूर्ण करूनही राज्याला तब्बल ७७ हजार कोटींचा आर्थिक लाभ होऊ शकतो. या रकमेतून राज्यावरील तब्बल एक चतुर्थांश कर्ज फेडता येईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.शासकीय वसाहतीमधील इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर काही इमारतींची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी अपुरा पडत असल्याने तेथे राहत असलेले शासकीय कर्मचारीच स्वखर्चाने दुरुस्तीची कामे करत असल्याबाबतचा मुद्दा शिवसेनेचे अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. वसाहतीच्या दुरुस्तीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार का, असा प्रश्नही परब यांनी केला. यावर बोलताना पाटील म्हणाले की, मुंबईतील दमट हवामानामुळे इमारतीचे स्टील, लोखंड गंजते. त्यामुळे या इमारतींची दुरवस्था झाली असून एकूण ३७० पैकी ३६ इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. वांद्रे येथील शासकीय कर्मचाऱ्यांचा वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निविदा काढल्या जातील. ७७ हजार कोटींचा फायदा अपेक्षितलार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने अहवालानुसार योग्य पद्धतीने पुनर्विकास झाल्यास ४ लाख ५० हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. यातून कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, सध्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बांधकाम खर्च घेऊन स्वत:च्या मालकीची घरे, येथील झोपड्यांचा एसआरए प्रकल्प आणि उच्च न्यायालयासाठीची जागा अशा गरजा भागविता येणार आहेत. इतके करूनही राज्य शासनाला ७७ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता असून या पैशांतून राज्यावरील २५ टक्के कर्ज फेडता येईल.