शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील २५ पक्ष ‘आउट’

By admin | Updated: December 26, 2016 01:06 IST

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.

हरीश गुप्ता / नवी दिल्लीनिवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश पक्षांची नोंदणी ही मुंबईतील आहे. रद्द करण्यात आलेल्या या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे; पण २००५नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढविलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ मात्र या पक्षांकडून घेण्यात येत होता. या राजकीय पक्षांनी निवडणूकच लढविली नाही आणि याच कारणास्तव त्यांची नोंदणी किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री असणाऱ्या या पक्षांविरुद्ध कार्यवाहीसाठी आयोगाने अन्य पर्याय निवडला. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला एक पत्र देऊन महाराष्ट्रातील या २५ पक्षांना त्यांच्या यादीतून हटविण्याबाबत त्यांनी सांगितले. हे पक्ष देणग्या आणि अन्य लाभ घेत होते. गोव्यातील चार राजकीय पक्षांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे. हे पक्ष यादीतून बाहेर१. अखिल भारतीय भारत माता-पुत्र पक्ष (धुळे), २. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सेना (पुणे), ३. बहुजन महासंघ पक्ष (अकोला), ४. भारतीय संताजी पार्टी, नागपूर, ५. काँग्रेस आॅफ पिपल (मुंबई), ६. लोक राज्य पार्टी (मुंबई), ७. महाराष्ट्र प्रदेश क्रांतीकारी पार्टी (सातारा), ८. महाराष्ट्र राजीव काँग्रेस (मुंबई), ९. महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (मुंबई), १०. महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), ११. नारीशक्ती पाटी (मुंबई), १२. नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), १३. नॅशनल मायनॉरिटी पार्टी (मुंबई), १४. नॅशनल रिपब्लिक पार्टी (मुंबई), १५. नेटिव्ह पीपल्स पार्टी (मुंबई), १६. नवमहाराष्ट्र विकास पार्टी (मुंबई), १७. नेताजी काँग्रेस सेना (पुणे), १८. पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग आॅफ इंडिया (नागपूर), १९. रिपब्लिक मुव्हमेंट (चंद्रपूर), २०. सचेत भारत पार्टी (मुंबई), २१. समाजवादी जनता पार्टी (महाराष्ट्र) (मुंबई), २२. दी कन्झ्युमर पार्टी आॅफ इंडिया (मुंबई), २३. विदर्भ जनता काँग्रेस (नागपूर), २४. विदर्भ राज्य मुक्ती मोर्चा (नागपूर), २५. वूमनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मुंबई).