शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के आॅनलाइन शाळा प्रवेशास मुदतवाढ

By admin | Updated: July 19, 2016 03:08 IST

मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली.

ठाणे : वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली. त्यानुसार, एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची निवड झाली, पण अवघ्या ६७ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. उर्वरित एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन करून शिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांतील खाजगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा तक्र ारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे वारंवार आल्यावर जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, प्रवेश प्रक्रि येत वंचित व दुर्बल गटांसाठी २५ टक्के आरक्षण देऊन त्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रि येद्वारे प्रवेश दिला. यासाठी जिल्हा परिषदेने दोन टप्प्यांत विशेष कार्यक्रम राबवला. या टप्प्यात जिल्ह्यातील ५६० शाळांसाठी एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रि येसाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ६७ विद्यार्थ्यांनीच त्यांना दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असून तब्बल एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी अद्यापही त्यांना दिलेल्या शाळेत प्रवेश घेतला नाही. पालकांना याबाबत अडचणी असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी व मनपा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.>यापुढे मुदतवाढ नाहीविद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ती १९ जुलै असून जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसेल तर त्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा. तसेच यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.