शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

मुलींसाठी अडीच लाखांची शिष्यवृत्ती

By admin | Updated: June 13, 2017 01:40 IST

फॉर यंग वूमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत देशातील बारावी पास झालेल्या मुलींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फॉर यंग वूमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत देशातील बारावी पास झालेल्या मुलींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या एकूण ५० विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येईल. त्यासाठी आवश्यक अर्ज विद्यार्थिनींना १० जुलैपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.देशातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना दिली जाईल. आतापर्यंत संस्थेने ३०० तरुण मुलींना विज्ञान शाखेतील करिअरसाठी सक्षम केले आहे. या शिष्यवृत्तीसाठी गेल्या वर्षी ३ हजारांहून अधिक प्रवेश अर्ज आले होते. चालू शैक्षणिक वर्षात बारावी इयत्तेत पीसीएम व पीसीबीमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. मात्र ३१ मे २०१७ रोजी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त नसावे. शिष्यवृत्ती विज्ञान शाखेतील कोणत्याही क्षेत्रातील अभ्यासासाठी खुली आहे. विद्यार्थिनींनी www.foryoungwomeninscience.com या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.