शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

By admin | Updated: April 21, 2016 03:18 IST

लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले.

५० वॅगनची पहिली खेप : १० वॅगनच्या झाल्या ९ खेपालातूर : लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले. मंगळवारी रात्री १०.५५ वाजता मिरजहून निघालेली ही जलपरी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता २५ लाख लिटर पाणी घेऊन पोहोचली. पाणीटंचाई असलेल्या भागांत रेल्वेद्वारे एकाचवेळी २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक केली जाण्याची ही देशात पहिलीच वेळ असावी. जलपरीच आगमन झाल्यानंतर ८.३० वाजेपासून ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लातूर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत हे पाणी साठविले जात आहे. त्यानंतर ते टँकरच्या सहाय्याने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात व तेथून टँकरने शहरात वितरीत केले जाणार आहे.या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून, डोंगरगाव, साई येथून बुधवारी उपलब्ध होणाऱ्या पाण्यापेक्षा रेल्वेचे हे पाणी जास्त आहे. बुधवारी सकाळी आलेल्या जलपरीतील पाणी ४.४५ वाजेपर्यंत उतरवून घेण्यात आले. या जलपरीचे स्वागत महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. रेल्वेचे मुख्य मोटारमन सुनील खोत आणि सहाय्यक मोटारमन बी.जे. पोळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वॅगन रिकामे करण्यास विलंबरेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीत ५० वॅगनमधील पाणी उतरविण्यात येत असताना विहिरीपासून टँकर पॉर्इंटपर्यंत बसविण्यात आलेला पाईप निसटला. त्यामुळे रेल्वे वॅगन रिकामी करण्यास विलंब झाला. जवळपास आठ तासांचा कालावधी वॅगन रिकामे होण्यास लागला. पुरवठा करणाऱ्या विहिरीवर सीसीटीव्ही लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरवर रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा साठा व उपसा करण्यात येणाऱ्या हैदरखान विहिरीच्या काठावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सायंकाळी जलपरी मिरजेकडे रवाना बुधवारी सकाळी आलेली जलपरी रिकामी होण्यास तब्बल आठ तासांचा कालावधी लागला. पाणी उतरवून घेतल्यानंतर जलपरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिरजेकडे रवाना झाली असल्याचे लातूर रेल्वे स्थानकातील व्यवसाय विभागातील मुख्य इन्स्पेक्टर आर.टी. काळे यांनी सांगितले. >रेल्वेमंत्री मिरजेत येणार ? लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने मिरजेतील रेल्वे विभागाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आठवड्यात मिरज व लातूर येथे भेट देऊन रेल्वेच्या या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत.