शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींच्या दागिन्यांची चोरी

By admin | Updated: December 17, 2015 00:54 IST

घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात असलेल्या ‘लीलाज ज्वेलर्स’मधून मौल्यवान हिऱ्यांसह अडीच कोटींच्या सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटे

ठाणे : घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात असलेल्या ‘लीलाज ज्वेलर्स’मधून मौल्यवान हिऱ्यांसह अडीच कोटींच्या सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या दुकानाच्या सुरक्षेची भिस्त असलेला सीसीटीव्हीही चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करीत आहेत. घोडबंदर रोडवरील वेगा शॉपिंग सेंटरमधील शॉप क्रमांक ४ मध्ये नवीनकुमार जैन यांचे हे दुकान आहे. मंगळवारी रात्री ९.३०च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. त्यानंतर, बुधवारी सकाळी १०वाजता जैन यांचे मावसभाऊ राजकुमार लोढा हे दुकान उघडण्यासाठी आले. त्या वेळी दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाच्या मागच्या बाजूची खिडकी गॅसकटरने तोडून चोरटे आत घुसले. दुकानातील लॉकर फोडून सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने असे मिळून एकूण अडीच कोटींचा ऐवज चोरीला केल्याचा दावा नवीन कुमार जैन यांनी रात्री उशीरा केला. दुकानाचे मालक नवीनकुमार हे बाहेरगावी गेले असून, ते आल्यानंतर नेमका आणखी किती ऐवज गेला, याची माहिती मिळेल, असे लोढा यांनी पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासात बुधवारी पहाटे २ ते ४च्या दरम्यान तीन ते चार जणांच्या टोळक्याने ही लूटमार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण केले होते. या दुकानाची माहिती असलेल्यांचाच चोरीमध्ये सहभाग असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. कासारवडवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)