शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्याचे २५ कोटी हडप

By admin | Updated: August 6, 2015 01:16 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून औरंगाबादच्या मे. मैत्री शुगर अँड ट्रेडिंग कंपनीला ३० कोटी रुपये देण्यात आले. त्यातील २५ कोटी रुपये हे महामंडळातील ३८५ कोटी

यदु जोशी , मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून औरंगाबादच्या मे.  मैत्री शुगर अँड ट्रेडिंग कंपनीला ३० कोटी रुपये देण्यात आले. त्यातील २५ कोटी रुपये हे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम संचालक असलेल्या कोमराल (हबटाऊन) कंपनीच्या खात्यात वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत मैत्री शुगर कंपनी खरेदी करण्यात आली. रमेश कदमने बँक आॅफ महाराष्ट्रच्या बोरीवली शाखेत असलेल्या महामंडळाच्या खात्यातून ३० कोटी रुपये आरटीजीएसने मैत्री शुगरच्या खात्यात टाकले. प्रत्यक्षात ही रक्कम औरंगाबाद येथील अमरदीपसिंग यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा झाले. या रकमेतून मैत्री शुगर कंपनीने परसोंडा, ता.वैजापूर येथील विनायक सहकारी साखर कारखाना विकत घेणे अपेक्षित होते पण घडले भलतेच. ३० कोटींपैकी २५ कोटी रुपये हे कोमराल (हबटाऊन) कंपनीच्या कॅनरा बँकेतील खात्यात जमा करण्यात आले आणि कदमने २० मार्च २०१५ रोजी त्याचे निकटवर्तीय कमलाकर ताकवाले आणि रामेश्वर गाडेकरच्या नावे ५ कोटी रुपयांत मैत्री शुगर कंपनी विकत घेतल्याचे दाखविले. सगळाच व्यवहार अनाकलनीय होता. आणखी एक धक्कादायक प्रकरण हे औरंगाबादमधील जमीन खरेदीचे आहे. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपये रमेश कदमने महामंडळातून उचलले. या जमिनीचा व्यवहार होण्याआधीच १० कोटी ७५ लाख रुपये हे जमिनीचे मालक कोहली यांच्या कॅनरा बँकेतील खात्यात जमा केले. जमिनीच्या नोंदणी खर्चापोटी ६५ लाख ७५ हजार रुपये हे महेंद्र एंटरप्रायजेसच्या (मालक कोहली) मलकापूर अर्बन बँकेत जमा करण्यात आले. फतेपूर; औरंगाबाद येथे २० गुंठे जमीन महामंडळाच्या नावे खरेदी करण्यात आली आणि धक्कादायक म्हणजे दीड एकर जमीन ही चक्क रमेश कदमच्या नावावर महामंडळाच्या पैशाने खरेदी करण्यात आली.