शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये न्यायालयाने मंजूर केला अडीच कोटींचा घटस्फोट

By admin | Updated: July 20, 2015 00:37 IST

नागपूर कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्यास आपसातील सहमतीने मंजूर केलेला घटस्फोट हा शहरातील बहुधा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. यात पतीकडून पत्नी आणि मुलीच्या

राहुल अवसरे, नागपूरनागपूर कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्यास आपसातील सहमतीने मंजूर केलेला घटस्फोट हा शहरातील बहुधा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. यात पतीकडून पत्नी आणि मुलीच्या पोटगी व इतर व्यवस्थेसाठी २ कोटी ८५ लाख रुपये दिले जाणार आहेत.नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी उभयपक्षी सहमतीनंतर घटस्फोटाचा हा दावा निकाली काढला. घटस्फोट झालेले दाम्पत्य नागपुरातील गर्भश्रीमंत, प्रतिष्ठित व व्यावसायिक कुटुंबातील आहे. पती ४४ आणि पत्नी ४३ वर्षांची आहे. या दोघांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी मोठ्या थाटात पार पडला होता. २५ फेब्रुवारी २०१२पर्यंत तब्बल २२ वर्षे त्यांचा संसार सुरळीत होता. त्यांना २४ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा आहे. अचानक पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते वेगवेगळे राहू लागले. भविष्यात एकत्र राहण्याची आशा नसल्याने त्यांनी परस्पर सामंजस्यातून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीने २२ मार्च २०१३ रोजी घटस्फोटासाठी न्याचिका दाखल केली होती. पत्नीनेही आपला दावा दाखल केला होता. दोघेही परस्पर सामंजस्यातून घटस्फोट देण्यास तयार झाले. दोघेही परस्परांपासून घटस्फोट याचिकाकर्त्या व्यावसायिकाने ताबडतोब पत्नीच्या एकमुस्त खावटीचा तसेच मुलीच्या निर्वाह, शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या रकमेचे ‘पे आॅर्डर’ न्यायालयात दिले.