शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

२५ अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस होण्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:03 IST

वर्ष उलटले, संधी मिळेना : प्रस्तावास विलंब, आता बैठक कधी होणार?

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : थेट आयएएस विरुद्ध पदोन्नत आयएएस असा छुपा संघर्ष राज्याला नवा नाही. आता महसूल विभागातील २५ अतिरिक्त जिल्हाधिकारी हे आयएएस होण्यासाठी एक वर्षाहून जास्त काळ प्रतीक्षा करीत असले तरी या भूमिपुत्रांना ती संधी मिळू शकलेली नाही.राज्याच्या आयएएसमध्ये थेट आयएएस विरुद्ध पदोन्नत (प्रमोटी) आयएएस असा दुजाभाव नेहमीच राहिला आहे. थेट आयएएस हे प्रमोटींना खालच्या दर्जाचे समजतात, आपल्या बरोबरीने वागणूक देत नाहीत ही वर्षानुवर्षांची खंत आहे. दोहोंमधील छुप्या संघर्षाची छाया पोस्टिंगवरही अनेकदा पडत आली आहे. प्रमोटी आहेत म्हणून डावलले गेल्याचीही उदाहरणे आहेत.जे २५ अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस मिळण्याची वाट पाहत आहेत त्यांना खरेतर गेल्या वर्षीच ही संधी मिळायला हवी होती पण त्यांचे गोपनीय अहवाल तयार करून पाठविण्यास बरेच महिने टाळाटाळ करण्यात आली. एप्रिल-मे २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडे आणि त्या माध्यमातून युपीएससीकडे प्रस्ताव पाठविणे अपेक्षित असताना डिसेंबर २०१९ मध्ये तो पाठविण्यात आला. हे अहवाल तयार करण्याची जबाबदारी कोणाची होती, हे महसूल विभागात सर्वांनाच ठाऊक आहे. पण वरिष्ठ असल्याने कोणी बोलण्यास तयार नाही. ‘आम्ही विभागातील ‘‘मनु’’वादचे बळी आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. एरवी लहान-लहान कारणांसाठी सरकार दरबारी गाºहाणी मांडणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघानेही यावर मौन बाळगले आहे.महसूलच्या अधिकाऱ्यांनी न्यायाची लढाई लढली तेव्हा कुठे पदोन्नत आयएएसची १४ पदे वाढवून मिळाली होती. ती मिळून २५ पदे भरावयाची आहेत. त्यातील वाढीव १४ पदे टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत भरू, असा पवित्रा सामान्य प्रशासन विभागाने घेत टाळाटाळ केली होती. कार्मिक विभागाने ती एकाच वर्षात भरा असा दणका दिल्याने सामान्य प्रशासन विभागाचा नाइलाज झाला.एक वर्ष विलंबाने मिळणार संधी२५ आयएएस जागांसाठी ७५ अधिकाºयांच्या नावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सेवाज्येष्ठता आणि चांगला गोपनीय अहवाल या आधारेच नावे निश्चित करण्यात येतात. युपीएससीने या प्रस्तावात काही त्रुटी दाखविल्या, त्यांची पूर्तता करून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.आता युपीएससीचे अधिकारी, मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन) यांची निवड समिती त्यातून अंतिम २५ नावे निवडणार आहे.या निवड समितीची बैठक कधी होणार याची अधिकाºयांना आता प्रतीक्षा आहे. मात्र, एकूणच विलंबामुळे महाराष्ट्रीय अधिकाºयांना आयएएस होण्याची संधी एक वर्षे विलंबाने मिळणार आहे.