शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

By admin | Updated: June 18, 2017 00:59 IST

पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी गेले असून, मुंबईत ७ बळी गेले आहेत, ही माहिती नुकतीच आरोग्य विभागाने दिली. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांमध्ये ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. विशेष करून मागील वर्षापेक्षा यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. २०१५ मध्ये स्वाइन फ्लूचे ३,०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण आढळले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत १७७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर-उपनगरातील ई, जी/नॉर्थ, के/ईस्ट, के/वेस्ट, एम/ईस्ट, एस आणि टी या पालिकेच्या विभागात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत.जून महिन्यात १ ते १५ या दरम्यान मुंबईत डेंग्यूचे १२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या वर्षी मे महिन्यात ४,४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४,१७१ रुग्णांची नोंद झाली होती. मे २०१६ मध्ये लेप्टोचे २ रुग्ण आढळले होते. या वर्षी आजपर्यंत लेप्टोचे ६ रुग्ण आढळले होते. मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टो व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना, गेस्ट्रो, कावीळ रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खासगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही.काळजी घ्या...स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, ताप व आजाराची अन्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधे वेळेवर घ्यावीत, असे आवाहन, मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.