शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांसाठी २४ हजार घरे होणार उपलब्ध

By admin | Updated: June 8, 2016 03:53 IST

३१ गिरण्यांच्या भूखंडांवर भविष्यात २४,७०० घरे गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीत म्हाडाच्या वाट्याला आलेल्या ३१ गिरण्यांच्या भूखंडांवर भविष्यात २४,७०० घरे गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली.विकास नियंत्रण नियमावली कलम ५८ अंतर्गत ज्या गिरण्यांच्या जागा संपादित करून राज्य सरकार म्हाडाद्वारे घरे बांधणार आहे, त्या ठिकाणी गिरणी कामगारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.एप्रिलच्या सुनावणीत कोर्टाने किती गिरणी कामगारांना घरे देणे शक्य आहे, अशी विचारणा सरकारकडे केली होती. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडे किती भूखंड उपलब्ध आहेत, याचेही उत्तर सरकारला देण्याचे निर्देश दिले होते. २४,७०० घरे बांधण्यात येतील, अशी माहिती खंडपीठाला दिली. ५८ गिरण्यांपैकी म्हाडाला ३१ गिरण्यांच्या भूखंडामध्ये वाटा मिळाला आहे. १० गिरण्यांमध्ये म्हाडाच्या वाट्याला काहीच भूखंड आला नाही. तर सहा भूखंडांचा ताबा अद्याप मिळाला नाही, याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सरकारने म्हटले आहे. (प्रतिनिधी)‘३१ गिरण्यांचा भूखंड मिळून म्हाडाला उपलब्ध होणाऱ्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी एकूण १६,९०० घरे प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहेत. तर ७, ८०० संक्रमण शिबिरे बांधण्यात येणार आहेत,’ अशी माहिती सरकारी वकील जे. डब्ल्यु. मॅट्टोस यांनी खंडपीठाला दिली.