शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २४ पेट्रोल पंप सील

By admin | Updated: June 25, 2017 01:58 IST

कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ३८ ठिकाणी राज्यात आतापर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ३८ ठिकाणी राज्यात आतापर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकले आहेत. त्यापैकी २४ ठिकाणी मापात पाप केल्याचे समोर आल्यावर त्या-त्या पेट्रोलपंपावरील ते युनिट सील केले आहेत, तसेच कारवाई केलेल्या काही पेट्रोल पंपांवर चिप बसलेल्या युनिटवर वाहनचालकांना पाठवून, तेथे जास्तीत जास्त पेट्रोलची कशा प्रकारे विक्री होते, ही बाब उघडकीस आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. शनिवारी राज्यातील सहा ठिकाणी पथक धाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाऱ्या मशिनमध्ये पल्सर नामक यंत्र असते. या यंत्रामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या पेट्रोलपंपांवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी १७ जूनला पहिली कारवाई केली. शनिवारी १८ जूनला ठाण्यातील इंडियन आॅइलच्या ऐकी आॅटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर पोलिसांनी छापा टाकला, या वेळी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी येथे प्रात्यक्षिकही केले. त्यानंतर, राज्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामार्फत छापासत्र सुरू आहे. या सत्रात शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि मुंबई अशा ३८ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये २४ ठिकाणी पेट्रोलची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.कारवाईचा तपशीलजिल्हा       कारवाई       सीलठाणे              १७            १४नाशिक         ०८             ०३रायगड          ०६            ०१पुणे                ०२            ०२सातारा           ०२            0२मुंबई              ०२             ०१औरंगाबाद        ०१           ०१