शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या तीन जवानांसह २४ जणांचा हिमस्खलनात मृत्यू

By admin | Updated: January 28, 2017 04:35 IST

काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे.

अकोला /बीड : काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे अकोल्याचे तर एक बीड जिल्ह्यातील आहे.गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोल्यातील पंचशील नगर भागातील आनंद गवई, मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे संजय खंडारे (२६) आणि बीडचे विकास समुद्रे यांचा मृत्यू झाला. आनंद हे २००९मध्ये सैन्यामध्ये दाखल झाले होते. आनंद यांच्या कुटुंबात आई-वडील आणि महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत मोठा भाऊ आहे. दोन आठवड्यांनी सुटीवर आल्यानंतर घरातील मंडळी आनंद यांच्या लग्नाची तयारी करणार होते; मात्र त्यांचा मृत्यू झाला. माना गावचे लष्कारात दाखल झाले होते. त्यांनी २१ जानेवारीपासून सुटी मागितली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे त्यांची सुटी रद्द झाली होती. बुधवारी झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील सुरेश खंदारे, आई सुलोचना, पत्नी शीतल, आठ महिन्यांचा मुलगा आदर्श, चार वर्षीय मुलगी परी असा परिवार आहे. बीड जिल्ह्याच्या धारूर येथील विकास पांडुरंग समुद्रे (२७) हे देखील या दुर्घटनेत मरण पावले. त्यांची आई जनाबाई व पत्नी प्रतिभा यांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही बातमी सांगितली नव्हती. विकास हेही २००९ साली सैन्यात भरती झाले होते. त्यांना परमेश्वर नावाचा छोटा भाऊ असून, दोन बहिणी आहेत. त्यांना दिव्या ही नऊ महिन्यांची कन्या आहे. वडील पांडुरंग समुद्रे यांचे दीड वर्षांपूर्वी आजारात निधन झाले.पुण्यातील एका खासगी कंपनीत चालक असलेल्या परमेश्वर यांना लष्करी अधिकाऱ्यांनी फोनवरून ही माहिती दिली. आईला उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांनी ही बातमी घरात कुणालाच सांगितली नाही. दुपारी वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकल्यानंतर त्यांच्या घराजवळ गावकरी गोळा झाले; मात्र आई आजारी असल्याने ही बातमी घरी न कळविण्याची विनंती परमेश्वर याने सर्वांना केली. वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी मे २०१६मध्ये विकास गावी आले होता. त्यानंतर त्यांना सुटी मिळाली नाही. १५ दिवसांपूर्वी ते फोनवरून आई, पत्नीशी बोलले होते. (प्रतिनिधी)हवामान सुधारताच जवानांचे मृतदेह मूळ गावी पाठविण्यात येतील, असे लष्कराने शुक्रवारी सांगितले. मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हवामान सुधारल्यानंतर ते त्यांच्या गावी रवाना करण्यात येतील, असे लष्करी प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. आणखी काही तास धोक्याचेकाश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत.