शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास पोस्टमॉर्टेमला ‘ना’

By admin | Updated: July 13, 2014 01:05 IST

सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने

मेडिकलचे न्यायवैद्यकशास्त्र विभाग : अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याची दिली कारणेसुमेध वाघमारे - नागपूरसूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात सांगितले. परंतु राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने (फॉरेन्सिक मेडिसीन) याला विरोध दर्शविला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारणे देऊन रात्रीचे पोस्टमॉर्टेम बंदच ठेवले आहे. पूर्वीच्या काळी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना विनाकारण या कायद्यामुळे त्रास होत होता. हा त्रास कमी व्हावा या उद्देशाने आव्हाड यांनी विधिमंडळात २४ ही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील सूचना राज्यातील सर्वच मेडिकल रुग्णालयांना पाठविण्यातही आल्या. परंतु रात्रीच्या वेळी हे गृह बंदच राहत असल्याची माहिती आहे. या विभागातील तज्ज्ञांच्या मते तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. तसे वैद्यकीय पुस्तकातही नमूद आहे. रुग्णालयाच्या नियमांमध्येही त्याची नोंद आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्या बाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. दुसरीकडे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच पोस्टमॉर्टेम करून देण्याचा आग्रह ठेवतात. यासाठी ते इतरांपर्यंत मृत्यूचा निरोप पोहचविण्याची आणि अंत्ययात्रेची तयारी करण्याची कारण देतात. यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, अपुरे मनुष्यबळ. यामुळे २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवणे अशक्यच आहे. एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्ट आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु अनेक मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्ट आणि तंत्रज्ञांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक मेडिकलच्या या विभागात दोन किंवा तीनपेक्षा जास्त यांची संख्या नाही. मंत्र्यांनी मनुष्यबळ दिल्यास आणि शवविच्छेदनगृहात व्यापक सोय करून दिल्यानंतरच हे शक्य आहे. मात्र, याचा विशेष असा फायदा होणार नाही हेही तेवढेच खरे आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दहा वर्षांपूर्वीही घेतलेला निर्णय मागे घेतलादहा वर्षांपूर्वीही २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याच्या निर्णय झाला होता. त्यावेळी न्यायवैद्यक प्रकरणे हाताळणाऱ्या समितीने याला विरोध दर्शवून विविध कारण देऊन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. याशिवाय २०१०-११च्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही एका आमदाराने याची मागणी केली होती. परंतु नंतर ही मागणी मागे घेतल्याची माहिती आहे.